Best Bus Contract Employees Strike News : राज्यातील बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दिनांक 3 ऑगस्ट 2023 पासून बेमुदत संप (Best Bus Strike) पुकारला आहे, त्यामुळे या संपामुळे सर्वसामान्य जनतेची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्य शासनाने अधिसूचना जारी केली आहे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या काय मागण्या आहेत? सविस्तर वाचा.
बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप - काय आहेत मागण्या?
बेस्टच्या Brihanmumbai Electricity Supply and Transport Undertaking (BEST) कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित आहे. मागण्या मान्य न झाल्यामुळे बेस्ट चे कर्मचारी दिनांक ३ ऑगस्ट पासून बेमुदत संपावर गेले आहे.
$ads={1}
बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या आहेत, त्यामध्ये समान काम समान वेतन, पगारामध्ये वाढ करण्यात यावी, सध्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांना १६ हजार रुपये इतका अल्प पगार मिळत आहे. तसेच मोटर ट्रान्सपोर्ट कामगार (Motor Transport Labor Act) कायद्यातील सुविधा मिळाव्यात, महिलांसाठी विशेष सुविधा, भाडेतत्त्वावर बस देणारे कंत्राटदार बदलले तरी सेवेचे सातत्य कायम ठेवण्यात यावेत, बेस्टचा बजेट आणि पालिकेचा बजेट एकत्र करण्यात यावा, आदी मागण्यांसाठी बेस्टच्या कंत्राटी कर्मचारी बेमुदत संपावर गेले असून, आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करण्यात येत आहे.
बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत शासनाने काढली अधिसूचना
विविध मागण्यांसाठी बीईएसटी (BEST) कामगार Gross Cost Contract (GCC) च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिनांक 3 ऑगस्ट 2023 पासून बेमुदत संप पुकारल्याचे निदर्शनास आले आहे. या संपामुळे सर्वसामान्य जनतेची गैरसोय होऊ नये, यास्तव प्रस्तावित आंदोलनाच्या कालावधीत प्रवासी वाहनांमधून प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी विनिर्दिष्ट करणे आवश्यक आहे. मुंबई महानगर परिक्षेत्रातील सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा वाहनांतून उदा. सर्व प्रकारच्या रिक्षा, टॅक्सी, खासगी बस, स्कूल बस आदींमधून प्रवाशांच्या वाहतुकीस संप संपेपर्यंतच्या कालावधीसाठी टप्पा वाहतूक करण्यास परवानगी देण्यात येत आहे. अशा प्रकारची अधिसूचना राज्य शासनाने जारी केली आहे.
सरकारी नोकरी- जिल्हा परिषद 34 जिल्ह्यातील जाहिराती एकाच ठिकाणी पहा - IBPS मध्ये 3049 जागांसाठी मोठी भरती
सर्व 34 जिल्हा परिषद जाहिराती एकाच ठिकाणी - जिल्हानिहाय जागा व जाहिराती डाउनलोड डायरेक्ट लिंक..
मोटार वाहन अधिनियम १९८८ (१९८८ च्या ५९) चे कलम ६६ थे उपकलम (३) च्या खंड (एन) अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने ही अधिसूचना जारी केली आहे.
$ads={2}
मुंबईत #बेस्ट कंत्राटी कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा वाहनांतून टप्पा वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली असून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.#BESTStrike pic.twitter.com/ez9lUFyMiA
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 5, 2023
सरकारी अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.