Appointment On Compassionate : सरकारी कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत असताना निधन झाल्यांनतर त्यांच्या कुटुंबांसाठी सरकारी सेवेत रिक्त पदावर अनुकंपा भरती प्रक्रिया राबविण्यात येते, ही प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावण्यासाठी विधानपरिषदेत उपस्थित प्रश्नाला सरकारकडून, कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती, देणेबाबत राज्य सरकारने स्पष्टोक्ती, विधानपरिषदेत दिली आहे, सविस्तर वाचा..
$ads={1}
शासकीय सेवेत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसाला अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याचे धोरण असताना, अनुकंपा नियुक्त्यांची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याने अनेक उमेदवार वयोमर्यादा ओलांडत असून, शासकीय सेवेत नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांना तातडीने अनुकंपा तत्वावर नियुक्त्या देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही उपाययोजना केली वा करण्यात येत आहे. याबाबत मा. सदस्य श्री.जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.
शासकीय सेवेत असताना दिवंगत झालेल्या गट-अ ते गट-ड (Group-A to Group-D) संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना अनुकंपा नियुक्तीसाठी पद उपलब्धतेनुसार प्रतिक्षासूचीवरील ज्येष्ठतेनुसार अनुकंपा नुियक्ती देण्यात येते. अनुकंपा नियुक्ती योजनेनुसार प्रतिक्षासूचीवरील उमेदवारास वयाच्या 45 वर्षापर्यंत नियुक्ती देण्यात येते.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडील सामायिक प्रतिक्षासूचीनुसार दिनांक 1 जुलै 2023 रोजी एकूण 6801 उमेदवार अनुकंपा नियुक्तीच्या प्रतिक्षासूचीवर आहेत. सद्य:स्थितीत सरळसेवेतील प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या 20 टक्के पदे अनुकंपा तत्त्वावर भरण्यात येत आहेत.
दिनांक 1 जानेवारी 2023 ते दिनांक 30 जून 2023 या कालावधीत गट-क च्या 838 व गट-ड च्या 531 अशा एकूण 1369 उमेदवारांना अनुकंपा नियुक्ती देण्यात आली आहे.
हे ही वाचा - जुलै च्या पगारात महागाई भत्ता रोखीने मिळणार - महाराष्ट्र - जुनी पेन्शन योजना लेटेस्ट न्यूज पहा - कंत्राटी कर्मचारी लेटेस्ट न्यूज
अनुकंपा प्रतिक्षासूचीवरील उमेदवारांना जलदगतीने नियुक्ती देण्यासाठी सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात येवून, जिल्ह्यातील सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडील अनुकंपा नियुक्तीचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अनुकंपा नियुक्ती जलदगतीने होण्यासाठी सामान्य प्रशासन विभागामार्फत संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे. अशी माहिती राज्याचे मा. मुख्यमंत्री यांनी विधानपरिषदेत दिली.