7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. खरं तर, कामगार मंत्रालयाने (AICPI index) निर्देशांकाची जून महिन्याची आकडेवारी जाहीर केली आहे. दिनांक 31 जुलै 2023 रोजी निर्देशांकाची आकडेवारी जाहीर करण्यात आली. या आकडेवारी नुसार पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या DA (महागाई भत्त्यात) मोठी वाढ होण्याचे संकेत आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या इतर भत्त्यांचे दरही सुधारित केले जाणार आहेत. असे झाल्यास केंद्रातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्याचा लाभ मिळणार आहे.
$ads={1}
आकडेवारी कोण जाहीर करते?
सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात किती वाढ होणार? हे AICPI इंडेक्सच्या आधारे ठरवले जाते. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक All India Consumer Price Index (AICPI) ची आकडेवारी कामगार मंत्रालयाकडून दर महिन्याच्या शेवटच्या वर्किंग डेच्या दिवशी जाहीर केली जाते.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ होणार
जून मध्ये AICPI index निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. जून निर्देशांक 136.4 अंकांवर पोहोचला आहे. मे महिन्यात त्याची संख्या 134.7 अंकांवर होती. जूनमध्ये एकूण 1.7 गुणांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मे महिन्याच्या आकडेवारीनुसार, एकूण DA स्कोअर 45.58 टक्के होता. तो जून महिन्यात वाढून 46.24 टक्के झाले आहे. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने DA मध्ये वाढ होण्याचे संकेत आहे.
महागाई भत्ता वाढीचा दर
AICPI च्या निर्देशांकाच्या आकडेवारी नुसार जानेवारी 2023 पासून महागाई भत्याचे दर पुढीलप्रमाणे
- जानेवारी 2023 – 43.10%
- फेब्रुवारी 2023 – 43.80%
- मार्च 2023 – 44.49%
- एप्रिल 2023 – 45.06%
- मे 2023 – 45.57%
- जून 2023 - 46.24%
पागारात वाढ किती होईल?
- जर मूळ पगार बेसिक (Basic Pay) - 31550 रुपये असेल तर
- सध्याचा महागाई भत्ता (DA) - 42 % - 13251 रु मध्ये
- नवीन महागाई भत्ता (DA) - 46 टक्के प्रमाणे नुसार - 14513 रुपये वाढ होईल.
- 4 टक्के महागाई भत्ता वाढवल्यास- 1262 रुपये जास्त मिळतील. म्हणजेच (1262*12)
- वार्षिक महागाई भत्ता वाढ - 15144 रुपये अधिक 4 % वाढीवर उपलब्ध होतील
- एकूण वार्षिक महागाई भत्ता - 174156 रुपये असेल.
हे ही वाचा - बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप - जुलै च्या पगारात मोठी वाढ होणार - कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ -जुनी पेन्शन योजना लेटेस्ट न्यूज पहा
सध्या जुलै महिन्यात वाढणाऱ्या महागाई भत्ता DA दर निश्चित करण्यात आला आहे, मात्र याबबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात सरकारकडून याची घोषणा केली जाऊ शकते.
सर्व 34 जिल्हा परिषद जाहिराती एकाच ठिकाणी - जिल्हानिहाय जागा व जाहिराती डाउनलोड डायरेक्ट लिंक..