Teachers Recruitment News : अखेर राज्यातील रखडलेल्या शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला असून, शिक्षक भरती बाबत एक महत्वाची बातमी अशी आहे की, राज्याचे मा. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मीडियाशी बोलताना राज्यात 50 हजार शिक्षकांची भरती होणार असून, पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षक भरती केली जाणार असल्याची माहिती दिली. सविस्तर पाहूया...
राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा
राज्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना मा. उच्च न्यायालय औरंगाबाद यांच्या आदेशान्वये शिक्षक भरतीवर स्थगिती आली होती. आता ही स्थगिती उठली असून, यांसदर्भात राज्याचे मा. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली. त्यामुळे आता शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यात 50 हजार शिक्षकांची भरती होणार
आता राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला असून, राज्यात 50 हजार शिक्षक भरती केली जाणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षक भरती होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले, तसेच ही शिक्षक भरती राज्यातील जिल्हा परिषद व अनुदानित शाळांतील रिक्त पदानुसार होणार असून, यासंदर्भातला शासन निर्णय आजच काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
सहा महिन्याची थकबाकी किती मिळणार? पहा.
मंत्रिमंडळ विस्तार यादी येथे पहा