Talathi Recruitment 2023 : मोठी अपडेट! तलाठी भरतीची वेबसाईट हँग, राज्य सरकारचा दिलासादायक निर्णय...

Talathi Recruitment 2023 : राज्यातील उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट, शासनाने बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेली तलाठी भरती प्रक्रिया अखेर सुरु आहे, राज्यामध्ये तलाठी भरतीच्या 4 हजार 644 जागा भरण्यात येणार असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून तलाठी भरती संदर्भात ऑनलाईन अर्ज सादर करण्यास सुरुवात झाली आहे, मात्र ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेबसाईट वारंवार हँग होत असल्यामुळे आता यासंदर्भात राज्य सरकारने एक दिलासादायक निर्णय घेतला आहे, सविस्तर वाचा.. 

$ads={1}

तलाठी भरतीची वेबसाईट हँग

Talathi Recruitment 2023

बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेली तलाठी भरती 2023 च्या परीक्षेसाठी राज्यातील उमेदवारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. एकाच वेळी लाखो तरुण ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी Talathi Bharti Website Apply Online संकेतस्थळास भेट देत असल्यामुळे Website (हँग) वारंवार बंद पडत आहे. यासंदर्भात सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात मा. सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला असता, यावर राज्य शासनाने राज्यातील तरुणांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे.

तलाठी भरती तपशील

राज्य सरकारचा दिलासादायक निर्णय

महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) या पदाच्या संवर्गातील एकूण 4 हजार 644 जागांची सरळसेवा भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. तलाठी भरतीकरिता दिनांक 26 जून 2023 पासून उमेदवारांची नोंदणी व ऑनलाईन अर्ज स्विकृतीची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.

राज्यात सुरू असणाऱ्या अतिवृष्टीमुळे इंटरनेट सेवा प्रभावित झाल्याने दुर्गम भागातील (PESA क्षेत्रातील) व इतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अडचणी निर्माण झाल्यामुळे आणि वेबसाईट वारंवार बंद पडत असल्यामुळे अजूनही राज्यातील इच्छुक व पात्र तरुणांनी अर्ज करू शकलेले नाहीत. 

यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी दिनांक 18 जुलै 2023 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. आता राज्य सरकारने उमेदवारांसाठी दिलासादायक निर्णय घेत, तलाठी भरती करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता दि. 25/07/2023 पर्यंत तलाठी भरती साठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे राज्यातील हजारो तरुणांना या निर्णयाचा दिलासा मिळाला आहे. 

महत्वाचे - तलाठी भरतीसाठी यापुर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तसेच दि. 25/07/2023 पर्यंत दिलेली मुदतवाढ ही अंतिम असून यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही. असे जाहीर करण्यात आले आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.{alertInfo}

$ads={2}
जुनी पेन्शन योजनेबाबत दिलासादायक बातमी
शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धेसाठी येथे क्लिक करा
कंत्राटी कर्मचारी संदर्भात धोरणात्मक निर्णय? पहा

तलाठी भरती अभ्यासक्रम पहा
तलाठी भरती जिल्हानिहाय जागा पहा
तलाठी भरती ऑनलाईन अर्ज - डायरेक्ट लिंक 

शैक्षणिक अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now