RTE Admission List 2023 : 'आरटीई' २५ टक्के प्रवेश प्रक्रिया २०२३ २४ करिता प्रतीक्षा यादीतील तिसरी यादी अखेर जाहीर करण्यात आली असून, राज्यातील ३३७१ मुलांची निवड झालेल्या पालकांना मेसेज पाठवण्यात आले आहेत, दिनांक १९ जुलै २०२३ या मुलांना प्रवेश घेण्यासाठी संधी देण्यात आली आहे.
अखेर! 'आरटीई' 25 टक्के प्रवेशाची तिसरी यादी जाहीर
'आरटीई' २५ टक्के अंतर्गत प्रवेश प्रक्रिया २०२३ २४ अंतर्गत यंदा ८१ हजार बालकांचे प्रवेश निश्चित झाले असून, मागील वर्षीच्या तुलनेत 2 हजार पेक्षा अधिक बालकांनी RTE प्रवेश घेतला आहे. गेल्या काही दिवसापासून प्रतीक्षेत असलेली तिसरी यादी जाहीर झाली आहे. प्रतीक्षा यादीतील उर्वरित मुलांना प्रवेशासाठी संधी देण्यात आली आहे. 'आरटीई' च्या तिसऱ्या यादीत राज्यातील ३३७१ मुलांची निवड करण्यात आली आहे.
'आरटीई' 25 टक्के प्रवेशासाठी 28 जुलै पर्यंत मुदत
प्रतीक्षा यादीतील (तिसरी यादी) प्रवेश पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत दिनांक 19/07/2023 पासून 28/07/2023 पर्यंत असणार आहे. प्रतीक्षा यादीतील प्रवेश पात्र बालकाच्या पालकांनी आरटीई पोर्टलवरील (RTE Portal) अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून ऍडमिट कार्ड ची प्रिंट काढावी तसेच हमी पत्राची प्रिंट देखील घेऊन जावी. Admit Card काढण्यासाठी पालकांनी लॉगिन करू नये पोर्टलवर दिलेल्या अर्जाची स्थिती या टॅबचाच वापर करण्यास आवाहन करण्यात आले आहे. येथे पहा अर्जाची स्थिती
अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित करून घ्यावा. आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे.
'आरटीई' 25 टक्के अंतर्गत 81 हजार बालकांचे प्रवेश निश्चित
बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009 नुसार, राज्यातील आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया अंतर्गत खाजगी नामांकित शाळेत बालकांना मोफत प्रवेश देण्यात येतो. यंदा शैक्षणिक वर्ष 2023 24 करिता जानेवारी 2023 पासूनच प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती.
त्यानुसार दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी आरटीई ऑनलाइन सोडत (लॉटरी) जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील 8 हजार 823 शाळांतील 1 लाख 1 हजार 846 जागांसाठी 3 लाख 64 हजार 413 अर्ज प्राप्त झाले होते.
त्यानुसार 94 हजार 700 मुलांची दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी लॉटरीमध्ये निवड करण्यात आली होती, आणि 81 हजार 129 मुलांची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली, त्यानुसार कागदपत्रे पडताळणी करून 64 हजार 29 मुलांचे प्रवेश निश्चित करण्यात आले.
त्यानंतर दुसऱ्या फेरीत प्रतीक्षा यादीतील 81 हजार 129 विद्यार्थ्यांपैकी रिक्त जागा नुसार प्राधान्य क्रमाने अनुक्रमे 25 हजार 898 मुलांना प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली आहे होती. त्यापैकी 13 हजार 685 मुलांचे प्रवेश निश्चित झाले.
आरटीई 25 टक्के प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीत प्रतीक्षा यादीतील (2nd) यादी जाहीर करण्यात आली, त्यामध्ये 8826 मुलांची निवड करण्यात आली असून, आतापर्यंत 3588 बालकांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
अशाप्रकारे आतापर्यंत राज्यातील 81 हजार 252 बालकांचे प्रवेश निश्चित झाले असून, 13 हजार 602 जागा रिक्त आहेत, तर मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 2 हजार 21 मुलांचे प्रवेश वाढले आहेत.
एसटी महामंडळाचा मोफत प्रवास बातमी पहासहा महिन्याची थकबाकी किती मिळणार? पहा.
कंत्राटी कर्मचारी न्यूज पहा
पुढील अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.
पुढील अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.