Retired Employees : राज्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, सेवानिवृत्तीनंतर इच्छुक व पात्र कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत अजून काम करण्याची संधी मिळणार आहे, राज्यातील शालेय शिक्षण विभागाने हा महत्वाचा निर्णय घेतला असून, सेवानिवृत्त शिक्षकांना दरमहा 20 हजार रुपये देण्यात येणार आहे, यासंदर्भातील सविस्तर बातमी वाचा..
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सरकारचा निर्णय
राज्यातील शैक्षणिक वर्ष २०२३ २४ दिनांक १५ जून २०२३ पासून सुरु झाले असून, राज्यातील शाळा सुरु झाल्या आहेत, शिक्षक भरती मा. उच्च न्यायालयात दाखल रिट याचिकांमुळे भरती प्रक्रीयेस विलंब होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
सेवानिवृत्त शिक्षकांना दरमहा 20 हजार रुपये मिळणार
या सर्व परिस्थिती विचारात घेऊन पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांतील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा परिषद शाळांतील रिक्त शिक्षकीय पदे भरण्याबाबत शासनाने संबंधित सर्व जिल्ह्यांना कळविले आहे.
सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांच्या नेमणूकी संदर्भात खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहे.
- सदर नियुक्तीसाठी सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांची जास्तीत जास्त वयोमर्यादा ७० वर्ष आहे.
- दरमहा मानधन २०,००० रु. (कोणत्याही इतर लाभाव्यतिरीक्त) देण्यात येणार आहे.
- जिल्हा परिषदेच्यावतीने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहणार आहे.
- सदर नियुक्ती ही कंत्राटी स्वरूपातील असल्याने इच्छुक व पात्र सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना करारनामा, बंधपत्र, हमीपत्र देणे आवश्यक असणार आहे.
- प्रत्येक जिल्ह्यांसाठी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी पात्र व इच्छुक उमेदवारांमधून आवेदनपत्र मागवून नियुक्ती आदेश देण्याबाबत कळविण्यात आले आहे.
- संबंधित शाळेतील रिक्त शिक्षकीय पदाची गरज लक्षात घेऊन त्याप्रमाणे अत्यावश्यक पदावर नियुक्ती देण्यात येणार आहे.
- वरीलप्रमाणे करण्यात आलेली नियुक्ती नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंतच असणार आहे.
सेवानिवृत्त शिक्षकांना सुवर्णसंधी
सेवानिवृत्त शिक्षकांसाठी ही भरती जरी कंत्राटी स्वरुपाची आणि तात्पुरती असली तरी सध्यस्थितीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आपला वेळ चांगल्या कामासाठी देता येणार आहे, त्याचबरोबर दरमहा 20 हजार रुपये मानधन देखील मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांना या संधीचा लाभ घेता येणार आहे. वरीलप्रमाणे नियुक्त्या १५ दिवसांच्या कालावधीत पूर्ण करण्यात येणार असल्याने जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हो प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार आहे. [सविस्तर परिपत्रक पहा]
GPF संदर्भातील महत्वाचे अपडेट लगेच पहा
पोस्ट ऑफिस भरतीचा निकाल जाहीर पहा यादी
सरकारी नोकरी जाहिरात लगेच अर्ज करा
सरकारी नोकरीच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.