Rajarshi Shahu Maharaj Scholarship : देशातील AIIMS, IIM, IIIT, NIT, IISc, IISER या शैक्षणिक संस्थांसह केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय संकेतस्थळावरील मान्यताप्राप्त नामांकित संस्थांमध्ये उच्चशिक्षणाची संधी विद्यार्थ्यांना आहे, सरकार तर्फे उच्चशिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती दिली जाते, या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
देशातील AIIMS, IIM, IIIT, NIT, IISc, IISER या शैक्षणिक संस्थांसह केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय संकेतस्थळावरील मान्यताप्राप्त नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जाती/नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यासाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना समाज कल्याण विभागाकडून राबविली जाते. या योजनेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे आयुक्त यांनी केले आहे.
हे ही वाचा - सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 60 वर्षे - कंत्राटी कर्मचारी नवीन धोरण PDF - कंत्राटी कर्मचारी निर्णय पहा
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी 100 विद्यार्थ्यांची निवड होणार
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी राज्यातील 100 अनुसूचित जातीच्या /नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. राज्यातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांना समान संधी देण्याच्या उद्देशाने विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळनिहाय 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते.
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती - मराठा विद्यार्थ्यांसाठी येथे अर्ज सुरु
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती किती मिळणार?
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांस संबंधित विद्यापीठ/ संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पूर्ण शिक्षण शुल्क, नोंदणी शुल्क, जिमखाना, ग्रंथालय, संगणक इत्यादी शुल्क संबंधित विद्यापीठ/ शैक्षणिक संस्थेमार्फत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅक खात्यात जमा करण्यात येते. वसतिगृह व भोजन शुल्क याचा देखील संस्था आकारणीनुसार खर्च देण्यात येणार आहे. तसेच पुस्तकांसाठी 5 हजार रुपये व इतर शैक्षणिक खर्चासाठी 5 हजार रुपये असे 10 हजार रुपये दोन टप्प्यात अदा केले जाणार आहे.
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज कोठे करावा?
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी योजनेविषयी आधिक माहिती, जाहिरात, अर्ज व नियमावली शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जलद दुवे रोजगार या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेली आहे. (लिंक खाली दिलेली आहे.) या संकेतस्थळावरुन विहित अर्जाचा नमुना डाऊनलोड करुन तो परिपूर्ण भरुन कागदपत्रांसह दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, ३ चर्च पथ, पुणे-411001 येथे करावा. पदवी /पदव्युतर पदवी/ पदव्युतर पदविका पूर्णवेळ अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ देय असणार आहे. राज्यातील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती समाजकल्याण आयुक्त यांनी दिली आहे.
$ads={2}
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती - अर्जाचा नमुना येथे डाऊनलोड - आधिक माहिती - येथे पहा
मोठा निर्णय! राज्यातील या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू(GR) पहा