Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar 2024 : प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 साठी प्रस्ताव सादर करण्याचे सरकारतर्फे आवाहन करण्यात आले आहे, या पुरस्कारासाठी ज्यांचे वय 18 वर्षापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार असून, पुरस्काराचे स्वरूप हे पदक, रोख 1 लाख रुपये बक्षीस व प्रमाणपत्र आणि प्रशस्तीपत्र असणार आहे, तर विशेष म्हणजे हा पुरस्कार भारताचे मा. राष्ट्रपती यांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार आहे, सविस्तर वाचा..
$ads={1}
प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024
असामान्य धाडस, क्रीडा, समाजसेवा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, कला आणि संस्कृती तसेच नवोन्मेष या क्षेत्रातील अतुलनीय कार्याला राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवून देण्याच्या उद्देशाने या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली आहे. मुलांची ऊर्जा, दृढनिश्चय, क्षमता, आवेश आणि उत्साह साजरे करण्यासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (PMRBP) आयोजित केला जातो.
पुरस्काराचे स्वरूप
प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 साठी खालीलप्रमाणे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.
- पदक (Medal)
- रोख 1 लाख रुपये बक्षीस (Cash prize of Rs. 1,00,000)
- प्रमाणपत्र आणि प्रशस्तीपत्र (Certificate and citation)
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी आवश्यक पात्रता
- भारताचे नागरिकत्व आणि रहिवासी असलेले मुले, मुली
- ज्यांचे वय 18 वर्षांहून अधिक नाही असे या पुरस्कारांसाठी अर्ज करू शकतात. किंवा
- कोणीही भारतीय नागरिक देखील पुरस्कारासाठी पात्र असणाऱ्या मुला-मुलींचे नामांकन करू शकतात.
निवड प्रक्रिया
प्राप्त अर्जांची छाननी प्रथम स्क्रीनिंग समितीद्वारे केली जाते आणि अंतिम निवड राष्ट्रीय निवड समितीद्वारे केली जाते.
पुरस्कार वितरण
- 26 डिसेंबर रोजी 'वीर बाल दिवस' या दिवशी पुरस्कार जाहीर केले जातील.
- भारताचे राष्ट्रपती यांच्याकडून नवी दिल्ली येथे दरवर्षी जानेवारी महिन्यात होणाऱ्या विशेष समारंभात/कार्यक्रमात पुरस्कार प्रदान केले जातील.
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करण्यास 31 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्यावतीने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केला जातो. यासाठी अर्ज पाठविण्याची तारीख ही 31 जुलै 2023 पर्यंतची होती, ती आता वाढवून 31 ऑगस्ट 2023 पर्यंत करण्यात आलेली आहे.
अर्ज येथे करा
प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार (PMRBP) 2024 करिता अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती पुढील वेबसाईटवर देण्यात आली आहे, तसेच पुरस्कारांसाठीचे अर्ज https://awards.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातूनच स्वीकारण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार (PMRBP) 2024 अर्ज करण्यासाठी पुढील स्टेप पहा
- प्रथम https://awards.gov.in या अधिकृत वेबसाईट वर जा
- तिथे Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar - Ministry of Women and Child Development Help Desk View Details ⟶ वर क्लिक करा.
- तुमच्या स्क्रीनवर होम पेज उघडेल, इथे तुम्ही सर्वप्रथम सर्व माहिती वाचून घ्या.
- आता Apply नावाच्या पर्यायावर क्लिक करा.
- स्क्रीनवर एक डायलॉग बॉक्स उघडेल जिथे तुम्ही तुमचे युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करू शकता पण जर तुम्ही नोंदणी केली नसेल तर तुम्हाला Don't Have An Account या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- आता Registration फॉर्म ओपन होईल येथे नोंदणी करा आणि त्यानुसार या पुरस्साकारासाठीअर्ज करा.