Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजनेसंदर्भात नुकतीच एक महत्वपूर्ण बैठक मंत्रिमंडळात पार पडली आहे, या बैठकीमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याबरोबरच सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करणे, ग्रॅज्युएटी किमान रक्कमेत वाढ करणे आदी महत्वपूर्ण विषयावर सखोल चर्चा करण्यात आली, जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट सविस्तर पाहूया..
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट
देशातील सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी, या मागणीसाठी सातत्याने आग्रही भूमिका घेत आहे, कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार यापूर्वीच 'जुनी पेन्शन योजना' ही राजस्थान, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, झारखंड व पंजाब या राज्यात NPS नंतर पुन्हा जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जुनी पेन्शन योजना संदर्भात कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना दिनांक १३ जुलै २०२३ रोजी एक महत्वाचे परिपत्रक काढण्यात आले आहे. सविस्तर वाचा.. [राज्यातील या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार]
जुनी पेन्शन योजना महत्वाची बैठक
राज्यातील दि. 1 नोव्हेंबर 2005 रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्यासाठी पुकारलेल्या (Strike) बेमुदत संपानंतर शासनाने दि. 14 मार्च 2023 रोजी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) व जुनी निवृत्तीवेतन योजना (Old Pension Scheme) यांचा तुलनात्मक अभ्यास करणाऱ्यासाठी अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली होती. सदर समितीचा 3 महिन्याचा कालखंड संपलेला आहे. आता शासन जुनी पेन्शन बाबत केव्हा आणि कोणते धोरण राबवेल हे नेहमीप्रमाणे अनिश्चित आहे.
त्यामुळे राज्यातील 'सर्व कर्मचाऱ्यांना म.ना.से.अधि. 1982 व 1984 ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी. यासाठी सर्व संघटना समन्वयाने 'जुनी पेन्शन चा पुढील लढा व दिशा' यावर चर्चा तसेच कृती कार्यक्रम निश्चित करून जुनी पेन्शन योजना राज्यात जश्याची तशी लागू करण्यासाठी सर्व सहकार्याने तीव्र लढा उभारणे आवश्यक आहे.
यासाबंधाने चर्चा करून कृती कार्यक्रम निश्चित करण्यासाठी राज्यातील सर्व राज्य शासकीय निमशासकीय अधिकारी / कर्मचारी, तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनांची सहविचार सभा मंगळवार, दि. 25 जुलै 2023 रोजी दुपारी 12.00 वाजता शेतकरी कामगार पक्ष यांचे कार्यालय बेलाई ईस्ट, मुंबई येथे आयोजित केली आहे. करिता सदर सभेत उपस्थित राहून 'जुनी पेन्शन' चा लढा यशस्वी करावा, अशी आपणास आग्रहाची विनंती महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
सातवा वेतन आयोग हप्ता मिळणार किती? पहा
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात २७% वाढ पहा
मोठा निर्णय ! वार्षिक 40 लाख रुपये शिष्यवृत्ती मिळणार पहा
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात २७% वाढ पहा
कंत्राटी कर्मचारी संदर्भात धोरणात्मक निर्णय? पहा