Old Pension Scheme Latest News : राज्यातील सरकारी कर्मचारी व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे, महासंघाने राज्य शासनाला दिनांक 12 जुलै 2023 रोजी एक महत्वाचे निवेदन दिले आहे, सविस्तर पाहूया..
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारचे आश्वासन
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्यासाठी दिनांक 14 मार्च ते दिनांक 20 मार्च 2023 या कालावधीत बेमुदत संप पुकारला होता. या संपामध्ये राज्यातील काही कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते. मा. मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्री यांनी जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्यासंदर्भात त्रिसदस्यीय समिती स्थापन केली असून, या समितीस दिनांक 14 जून 2023 पर्यंत मुदत देण्यात आली होती.
तदनंतर दिनांक 22 जून 2023 रोजी मा. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी पूर्वलक्षी मागणी महासंघाने केली होती. शासनाने नियुक्त केलेल्या समितीला मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री यांनी दि. 20 मार्च 2023 रोजी महासंघाला लेखी दिलेल्या आश्वासनानुसार सामाजिक आणि आर्थिक स्थैर्यासह निवृत्तीवेतन देण्यासंबंधी मा. मुख्यमंत्री महोदयांनी वैयक्तिकरित्या सांगितले आहे. असे सदर बैठकीत महासंघाच्या वतीने सांगण्यात आले.
यासंदर्भात सद्यस्थिती ही नेमलेल्या अभ्यास गटास एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे, अशी मा. मुख्यसचिवांनी माहिती दिली होती. महासंघ पदाधिकाऱ्यांनी हा अहवाल सादर करण्यासाठी यापुढे दुसरी मुदतवाढ देऊ नये, असे आग्रहीरित्या प्रतिपादित केले होते.
जुनी पेन्शन योजनेबाबत मोठी अपडेट
राज्यातील सरकारी कर्मचारी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासंदर्भात महासंघाने नुकतेच राज्य शासनाला दिनांक 12 जुलै 2023 रोजी निवेदन दिले आहे. त्यानुसार शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्ती तातडीने करावी अशी राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी व शिक्षकांची रास्त अपेक्षा आहे. यासाठी राज्याचे मुख्य सचिव या नात्याने आपण पुढाकार घेऊन आम्हांस दिलासा द्यावा, अशी आग्रहाची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. [सविस्तर निवेदन पहा] (दिनांक 22 जून 2023 रोजीच्या बैठकीचे इतिवृत्त पहा)
कर्मचाऱ्यांचे सरकारच्या निर्णयाकडे लागले लक्ष
आता राज्यातील कर्मचाऱ्यांचे जुनी पेन्शन योजना संदर्भात सरकार काय निर्णय घेते? याकडे जवळपास 17 लाख कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले असून, सरकारने नेमलेल्या त्रीसदस्यीस समितीच्या अहवालानुसार राज्य शासन निर्णय घेणार आहे. त्यामुळे हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी अपेक्षा राज्यातील कर्मचाऱ्यांना आहे.
इन्कम टॅक्स ITR रिटर्न फाइल करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी