NMMS Scholarship 2023 : NMMS Scholarship Exam 2024 : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२४-२५ या परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली असून, सदर परीक्षा दि. २२ डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे. यासाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठीच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. शिष्यवृत्तीस पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यास दरमहा 1000 रुपये प्रमाणे वार्षिक 12000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. NMMS परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज दिनांक ०५/१०/२०२४ पासून सुरु झाले असून, सविस्तर माहिती पाहूया..
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना - NMMS 2024-25
NMMS Full Form - National Means cum Merit Scholarship Scheme Exam -2024-25
केंद्रशासना मार्फत (शिक्षण मंत्रालय भारत सरकार, नवी दिल्ली) 2007-08 पासून आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी सदरची परीक्षा इ. 8 वी साठी सुरु केली आहे. यावर्षी NMMS परीक्षा ही दिनांक २२ डिसेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
एनएमएमएस (NMMS) योजनेचे उदिष्ट
- इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्याचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करणे.
- विद्यार्थ्याचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत करणे.
- विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकसित होऊन त्या विद्यार्थ्याकडून आपली विद्याशाखा व राष्ट्र यांची सेवा घडावी.
एनएमएमएस (NMMS) शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना किती शिष्यवृत्ती मिळते?
एनएमएमएस (NMMS) परीक्षेसाठी आवश्यक पात्रता
- महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता 8 वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणारे नियमित मुला/मुलीना या परीक्षेस बसता येते.
- पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे.
- नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापनाप्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा / तलाठयांचा सन २०२२-२३ च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा.
- सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवावा.
- विद्यार्थी/विद्यार्थ्यांनी इ.7 वी मध्ये किमान 55% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.
- (अनुसूचीत जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) चा विद्यार्थी किमान 50% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.)
एनएमएमएस (NMMS) परीक्षा महत्वाच्या तारखा
- ऑनलाईन अर्ज सुरू - ०५/१०/२०२४
- अंतिम तारीख - ०४/११ /२०२४
- NMMS परीक्षा - २२ डिसेंबर 202४
एनएमएमएस (NMMS) परीक्षा स्वरूप व अभ्यासक्रम
उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.
- सामान्य विज्ञान 35 गुण, भौतिकशास्त्र 11 गुण, रसानशास्त्र 11 गुण, जीवशास्त्र 13 गुण,
- समानशास्त्र 35 गुण, इतिहास 15 गुण, नागरिकशास्त्र 05 गुण, भूगोल 15 गुण
- गणित 20 गुण
एनएमएमएस (NMMS) ऑनलाईन अर्ज
एनएमएमएस (NMMS) ऑनलाईन अर्ज दिनांक ०५/१०/२०२४ पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in व https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील. संबधित शाळांनी विद्यार्थ्यांचे कागदपत्रे जतन करून ठेवण्याबाबत कळविण्यात आले आहे. (2023- निकाल पहा)
सविस्तर माहितीपत्रक - अधिसूचना येथे पहा
शिष्यवृत्ती परीक्षा (5 वी आणि 8 वी) 2025 ऑनलाईन नोंदणी सुरू, अधिसूचना पाहा
बालसंगोपन सुधारित योजना (वार्षिक 27000 रुपये) पहा
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती (मराठा) येथे अर्ज करा
वार्षिक 40 लाख रुपये शिष्यवृत्तीसाठी येथे अर्ज करा