MAHADES Sarkari Naukri : अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई अंतर्गत इयत्ता 10 वी ते पदवीधारक आणि आवश्यक इतर शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून दिनांक 15 जुलै 2023 ते दिनांक 5 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आले आहेत. सविस्तर जाहिरात पाहूया..
अर्थ व सांख्यिकी संचालनालय विभागात 260 जागांसाठी भरती
अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील नामनिर्देशनाची रिक्त असलेली पदे भरण्याकरीता तब्बल 260 जागांसाठी सरकारी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या इच्छुक व पात्र उमेदवारांना सुवर्णसंधी आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज हे दिनांक 15 जुलै 2023 ते दिनांक 5 ऑगस्ट 2023 या कालावधीत उमेदवारांना भरता येणार आहे.
दहावी ते पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी
अर्थ व सांख्यिकी संचालनालय अंतर्गत सहाय्यक संशोधन अधिकारी गट-ब, सांख्यिकी सहाय्यक गट-क आणि अन्वेषक गट- क या तीन पदांसाठी रिक्त असलेल्या 260 जागांसाठी भरती निघाली आहे. राज्यातील दहावी उत्तीर्ण ते पदवीधारक आणि आवश्यक इतर शैक्षणिक पात्रता धारक पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज भरू शकतात.
वेतनश्रेणी
- सहायक संशोधन अधिकारी, गट-ब : S-14 : 38600 - 122800
- सांख्यिकी सहायक, गट-क : S-10 : 29200 - 92300
- अन्वेषक, गट- क : S-8 : 25500-81100
पदांचा तपशील व रिक्त जागा
वयोमर्यादा
खुला प्रवर्ग - 18 ते 38 वर्षे (दोन वर्ष शिथिलता)राखीव प्रवर्ग- 18 ते 43 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता
- सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब – मान्यताप्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी / बायोमेट्रिक्स / गणित / अर्थशास्त्र / अर्थमिती / गणितीय अर्थशास्त्र / वाणिज्य मध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
- सांख्यिकी सहाय्यक गट क – मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य / अर्थमिति / सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
- अन्वेषक गट क – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी पास) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
तसेच वरील तीनही पदांसाठी संगणक हाताळणी वापराबाबतचे (MS-CIT) किंवा इतर त्यास समकक्ष परीक्षा उत्तीर्णे आवश्यक आहे.
कृषी विभागात सरकारी नोकरीसाठी अर्ज येथे करा
महत्वाच्या तारखा
- जाहिरात - दिनांक 13 जुलै 2023
- ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी - दिनांक 15 जुलै 2023 ते दिनांक 5 ऑगस्ट 2023
- प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध होण्याचा संभाव्य दिनांक - परीक्षेपूर्वी 7 ते 10 दिवस
- ऑनलाईन परीक्षेचा संभाव्य दिनांक - सप्टेंबर 2023
ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप
सहाय्यक संशोधन अधिकारी गट-ब, सांख्यिकी सहाय्यक गट-क पदांकरीता परीक्षेचा दर्जा मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान असेल. ऑनलाईन परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रत्येकी 50 गुणांचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. ऑनलाईन परीक्षा 200 गुणांची राहील.
अन्वेषक, गट - क पदाकरीता परीक्षेचा दर्जा माध्यमिक शालांत 10 वी परीक्षेच्या दर्जाच्या समान असेल. ऑनलाईन परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रत्येकी 50 गुणांचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. ऑनलाईन परीक्षा 200 गुणांची राहील.
- अर्थ व सांख्यिकी संचालनालय - PDF जाहिरात
- ऑनलाईन अर्ज करा – https://ibpsonline.ibps.in/desmar23/ (ऑनलाईन अर्ज माहिती येथे पहा)
- अधिकृत वेबसाईट – www.mahades.maharashtra.gov.in
सरकारी नोकरीची संधी पहा
कंत्राटी कर्मचारी संदर्भात लेटेस्ट न्यूज पहा