IBPS Clerk Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी, आयबीपीस Institute of Banking Personnel Selection (IBPS) Clerk XIII पदाच्या एकूण 4045 रिक्त जागांसाठी मोठी भरती निघाली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे, आवश्यक पात्रता, भरतीचे वेळापत्रक, ऑनलाईन अर्ज कोठे व कसा करावा? सविस्तर पाहूया..
सरकारी बँकामध्ये 4000+ रिक्त जागांसाठी मेगाभरती
IBPS भरती 2023 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार एकूण 4045 रिक्त जागांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. IBPS Clerk XIII पदाची पात्रता पूर्ण करण्याऱ्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. तरुणांसाठी ही सुवर्णसंधी असून, जाणून घेऊया संपूर्ण प्रक्रिया.
आवश्यक पात्रता
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी असणे आवश्यक आहे. किंवा त्यास समकक्ष शिक्षण संस्थेतील किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं असाव.
वयोमर्यादा: उमेदवारांचे किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 28 वर्षे असणे आवश्यक आहे.
आयबीपीयस भरतीच्या महत्वाच्या तारखा (वेळापत्रक) - IBPS Clerk Recruitment 2023 Schedule
- ऑनलाईन अर्ज - 1 जुलै ते 21 जुलै 2023
- ऑनलाईन फी भरणे - 1 जुलै ते 21 जुलै 2023
- पूर्व परीक्षा कॉल लेटर - ऑगस्ट 2023
- ऑनलाइन पूर्व परीक्षा (Preliminary Exam) - ऑगस्ट/ सप्टेंबर 2023
- परीक्षेचा निकाल - सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2023
- मुख्य परीक्षेसाठी कॉल लेटर - सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2023
- ऑनलाइन मुख्य परीक्षा - ऑक्टोबर 2023
- Provisional allotment - एप्रिल 2024
नोट - उमेदवारांनी भरतीच्या प्रत्येक अपडेट साठी IBPS च्या अधिकृत वेबसाइट www.ibps.in वर भेट द्यावी.