Government Scheme Childcare : महाराष्ट्र राज्यातील मुलांच्या संगोपनासाठी सरकारची खास योजना म्हणजे बाल संगोपन योजना आता या योजनेत मोठा बदल करण्यात आला असून, यापुढे ही सरकारी योजना 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना' या नावाने राज्यात राबविली जात आहे.
$ads={1}
बालसंगोपन योजनेंतर्गत निधीचे वितरण - महिला व बालविकास मंत्री
कोरोना काळात एक अथवा दोन्ही पालकांचे निधन झालेल्या बालकांना बालसंगोपन योजनेंतर्गत योजनेचा लाभ देय करण्यात आला असून, दि. 31 मार्च 2023 पर्यंतच्या लाभाची रक्कम या सर्व मुलांना वितरित करण्यात आली आहे, असे उत्तर महिला व बालविकास मंत्री यांनी प्रश्नोत्तरांच्या तासात विधानपरिषदेत दिली.
मुलांच्या संगोपनासाठी वार्षिक 27000 रूपये मिळणार - सुधारित बालसंगोपन योजना
बालसंगोपन योजनेत दरमहा 1100 रूपये या अनुदानात वाढ करुन, आता दरमहा 2250 रूपये प्रमाणे लाभ देण्यात येतो. असे वार्षिक एकूण 27000 रुपये पात्र लाभार्थ्यांना दिले जातात.
तसेच संस्थेस उपलब्ध करुन देण्यात येणारे प्रतिबालक प्रतिमहा अनुदानात रू. 125/- वरून रू. 250/- अशी वाढ करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये अर्थसंकल्पित 54 कोटी 84 लाख इतका संपूर्ण निधी वितरित करण्यात आला आहे. तसेच या योजनेसाठी 136 कोटी 13 लाख इतक्या निधीची पुरवणी मागणी करण्यात आली आहे.
बालसंगोपन योजनेचे सर्व शासन निर्णय अधिक्रमित करुन शासन निर्णय दि. 30 मे 2023 अन्वये बालसंगोपन योजनेचे नाव बदलून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना असे करण्यात आले असून योजनेच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. [बालसंगोपन सुधारित योजना 2023 येथे पहा]