Govt Employees News : राज्यातील सरकारी कर्मचारी व निवृत्तीवेतन धारकांच्या महागाई भत्यात 4% वाढीचा शासनाने निर्णय घेतला असून, राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांना याचा लाभ लवकरच थकबाकीसह मिळणार आहे, मात्र दरमहा वेतन (Salary) आणि निवृत्ती वेतन (Pension) बऱ्याचदा उशिरा होते, यासाठी आता शासनाने दरमहा वेतन वेळेत होण्यासाठी एक महत्वाचे परिपत्रक काढले आहे, सविस्तर वाचा..
राज्यातील सरकारी कर्मचारी व निवृत्तीवेतन धारकांचे वेतन वेळेत होणार?
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे दरमहा वेतन आणि निवृत्तीवेतन (पेन्शन) (Government Employees Salary & Pension) जमा होण्यास बऱ्याचदा वेळ होतो. जिल्हा परिषदांकडुन दरमहा मागविण्यात येणारी नियमित वेतन व निवृत्ती वेतनाबाबतची माहिती (अनुदान मागणीपत्र) शासनास दर महिन्याला करावी लागते, मात्र ही माहिती शासनास उशिराने प्राप्त होत असल्याने पगार उशिरा होतो.
त्यामुळे जिल्हा परिषद अधिकारी/कर्मचारी यांचे नियमित वेतन व सेवानिवृत्ती वेतन वेळेत त्यांच्या खात्यावर जमा होत नसल्याच्या तक्रारी दुरध्वनी द्वारे/ निवेदनाद्वारे शासनाकडे येत असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. यासाठी आता यासाठी शासनाने दरमहा वेतन आणि निवृत्तीवेतन वेळेत अदा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक काढले आहे.
त्यानुसार आता जिल्हा परिषदांकडुन दरमहा मागविण्यात येणारी नियमित वेतन व निवृत्ती वेतनाबाबतची माहिती (अनुदान मागणीपत्र) शासनास दर महिन्याला 20 तारखेपर्यंत उपलब्ध करुन देण्यात यावी, असे निर्देश शासन स्तरावरून जिल्हा परिषदांना देण्यात आले आहे.
कंत्राटी कर्मचारी शासकीय सेवेत नियमित होणार? राज्य सरकारचा मोठा निर्णय!
कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता थकबाकी या महिन्यात मिळणार
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने आता राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना 42% प्रमाणे महागाई भत्ता मिळत आहे. तो यापूर्वी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 38% प्रमाणे मिळत होता, दिनांक 30 जून 2023 रोजी राज्याच्या वित्त विभागाने महागाई भत्त्यात 4% वाढीचा शासन आदेश निर्गमित केला असून, ही DA वाढ दिनांक 1 जानेवारी 2023 पासून लागू असणार आहे. [येथे चेक करा तुमची थकबाकी रक्कम..]
राज्यातील असे कर्मचारी ज्यांना निवृत्तिवेतन योजना लागू केलेली आहे, अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी / कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये यांमधील निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांना देखील महागाई भत्याचा निर्णय लागू करण्यात आला आहे. सविस्तर वाचा...
महागाई भत्ता या महिन्यात थकबाकी चेक कराकंत्राटी कर्मचारी शासन सेवेत? मोठा निर्णय पहा