राज्यातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात शासनाने दोन महत्वाचे शासन निर्णय निर्गमित केले असून, कर्मचाऱ्यांना वेतन व इतर खर्चाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर गट-अ ते गट- ड पदाच्या दिव्यांग आरक्षणासंदर्भात महत्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे. सविस्तर पाहूया..
परिवहन आयुक्त यांच्या आस्थापनेवरील पदे दिव्यांग आरक्षणातून वगळणार
परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या आस्थापनेवरील गट-अ ते गट ड मधील विविध पदांसाठी दिव्यांग आरक्षण सुनिश्चित करण्याबाबत प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांगासाठी शासन सेवेत पदे सुनिश्चित करण्यासाठी तज्ञ समिती गठीत करण्यात आली होती. [दिव्यांग विषयक बातम्या पहा]
या तज्ञ समितीच्या दि.22 व 23 फेब्रुवारी 2021 रोजी झालेल्या बैठकीतील इतिवृत्तानुसार, दिनांक 4 जुलै 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार आता परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या आस्थापनेवरील मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, पहारेकरी व वाहन चालक ही पदे दिव्यांग आरक्षणातून वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
जुलै च्या पगारात होणार एवढी वाढ, येथे पहा
कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर लाभ प्रदान करण्यास शासनाची मंजुरी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या माहे जून 2023 च्या वेतनासाठी, राज्य परिवहन महामंडळास माहे मे 2023 चे सवलतमूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी तसेच मे 2023 मधील उत्पन्न व इंधन, वेतन, देखभाल दुरुस्ती खर्च रक्कम प्रदान करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. [सातव्या वेतन आयोगाची थकबाकी संदर्भात अपडेट पहा]
दिनांक 5 जुलै 2023 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या माहे जून 2023 च्या वेतनासाठी व राज्य परिवहन महामंडळास माहे मे 2023 च्या सवलतमूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी कर्मचाऱ्यांना सदरचा लाभ रोखीने प्रदान करण्यास शासनाने मान्यता देण्यात आली आहे. [राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरघोस वाढ पहा]
यासाठी परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना प्राधिकृत करण्यात येत असून त्यांच्या कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी असलेले लेखाधिकारी यांनी सदर रक्कम आहरित करुन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास अदा करण्यास कळविण्यात आले आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या माहे जून 2023 चे वेतन आणि व मे 2023 सवलतमूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी उत्पन्न व इंधन, वेतन, देखभाल दुरुस्ती खर्च लवकरच कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
आरटीई 25 टक्के प्रवेशाच्या 7 हजाराहून अधिक जागा रिक्त