Government Employees Latest News : राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, वयाच्या 50-55 वर्षा पलीकडे अर्हताकारी सेवा (Qualifying Service) 30 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या सेवा पुढे चालू ठेवण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. सविस्तर बातमी वाचा..
राज्य सरकारचा मोठा निर्णय
राज्यातील तंत्र शिक्षण संचालनालयांतर्गत गट-अ व गट-ब (राजपत्रित) (Group-A and Group-B (Gazetted)) संवर्गात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची वयाच्या 50-55 वर्षापलीकडे अर्हताकारी सेवा 30 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या सेवा पुढे चालू ठेवण्यास शासनाने मान्यता दिली असून, राज्यातील जवळपास 559 अधिकारी/कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे, तसा शासन आदेश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिनांक 11 जुलै 2023 रोजी जारी केला आहे.
महागाई भत्ता वाढ या महिन्यात मिळणार आदेश जारी पहा
तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या तसेच, दिनांक 1 ऑगस्ट 2020 रोजी वयाची 50-55 वर्षे अथवा अर्हताकारी सेवेची ३० वर्षे पूर्ण केली आहेत, अशा अधिकाऱ्यांचे वयाच्या 50-55 वर्षांपलीकडे अथवा अर्हताकारी सेवा 30 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, त्यांच्या सेवा पुढे चालू ठेवण्याबाबत प्रधान सचिव (उच्च व तंत्र शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखालील 'विभागीय पुनर्विलोकन समिती' ची बैठक दिनांक 23 मे 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती.
विभागीय पुनर्विलोकन समिती च्या शिफारशीनुसार, राज्यातील तंत्र शिक्षण संचालनालयांतर्गत गट-अ व गट-ब (राजपत्रित) संवर्गातील अधिकारी सामान्य प्रशासन विभागाने निश्चित केलेल्या निकषांची पूर्तता करीत असल्याने, सदर अधिकाऱ्यांनी वयाच्या 50-55 वर्षे पूर्ण केल्यानंतर अथवा अर्हताकारी सेवेची 30 वर्षे पूर्ण केल्यानंतर, त्यांच्या सेवा पुढे चालू ठेवण्यास दिनांक 11 जुलै 2023 रोजीच्या आदेशान्वये शासन मान्यता देण्यात आली आहे. [आदेश पहा]