General Provident Fund News : देशातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट, अर्थात सामान्य भविष्य निर्वाह निधी म्हणजेच (GPF) General Provident Fund च्या व्याजदर सरकारने जाहीर केले असून, हे व्याजदर दिनांक 1 जुलै 2023 पासून लागू करण्यात येणार आहे. अर्थ विभागाने दिनांक 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2023 या तीमाहीतील व्याज दर घोषित केले असून, याचा देशातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. सविस्तर बातमी पाहूया..
जीपीएफ (GPF) म्हणजे काय?
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच General Provident Fund (GPF) ही एक सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुंतवणुकीची योजना आहे. ही एक PF प्रमाणेच एक सरकारी बचत योजना आहे. सामान्य भविष्य निर्वाह निधीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पगारातील काही टक्के रक्कम ही GPF मध्ये गुंतवले, तर त्यांना एकूण सेवेच्या कालावधीमध्ये जमा झालेली रक्कम ही कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या वेळी किंवा आवश्यकतेनुसार आपत्कालीन परिस्थितीत देण्यात येते.
जीपीएफ (GPF) चे जुलै-सप्टेंबर तिमाहीतील व्याजदर जाहीर
वित्त विभागाकडून प्रत्येक तिमाहीचे व्याजदर जाहीर होत असतात. नुकतेच दिनांक 1 जुलै 2023 ते दिनांक 30 सप्टेंबर 2023 या तीमाही तील GPF चे व्याजदर वित्त विभागाने जाहीर केले असून, या कालावधीतील व्याजदर हे 7.1% व्याजदर कायम ठेवण्यात आले आहे. याबाबतची अधिकृत अधिसूचना अर्थ विभागाने दिनांक 5 जुलै 2023 रोजी जारी करण्यात आली आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
सामान्य भविष्य निर्वाह निधी GPF (General Provident Fund) हे केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसेच अनेक सरकारी विभागांना लागू होतो. आता हे व्याजदर दिनांक 1 जुलै 2023 पासून लागू करण्यात येणार आहे.
- सामान्य भविष्य निर्वाह निधी (केंद्रीय सेवा)
- अंशदायी भविष्य निर्वाह निधी
- अखिल भारतीय सेवा भविष्य निर्वाह निधी
- राज्य रेल्वे भविष्य निर्वाह निधी
- सामान्य भविष्य निर्वाह निधी (संरक्षण सेवा)
- भारतीय आयुध विभाग भविष्य निर्वाह निधी
- भारतीय आयुध विभाग फॅक्टरी सेवा
- भारतीय नौदल डॉक कामगार भविष्य निर्वाह निधी
- संरक्षण सेवा अधिकारी भविष्य निर्वाह निधी
- सशस्त्र दल भविष्य निर्वाह निधी
देशभरातील ज्या कर्मचाऱ्यांना GPF योजना लागू आहे. अशा सर्व कर्मचाऱ्यांना आता जुलै ते सप्टेंबर 2023 या तिमाहीत 7.1% प्रमाणे व्याजदर मिळणार आहे.