राज्यातील शालेय विद्यार्थ्याना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती रकमेत भरघोस वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा इयत्ता 5 वी आणि 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये पात्र विद्यार्थ्यांना Educational Scholarship देण्यात येते. या शिष्यवृत्ती मध्ये तब्बल 13 वर्षानंतर भरीव वाढ करण्यात आली आहे, तसा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने दिनांक 3 जुलै 2023 रोजी जारी केला आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेचे सन 1954 सालापासून आयोजन
राज्यातील गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच स्पर्धात्मकतेसाठी प्रोत्साहीत करणे हा शिष्यवृत्ती परीक्षेचा मुळ गाभा आहे. राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षेला विशिष्ट असा दर्जा आहे. शिष्यवृत्ती मिळविणे ही विद्यार्थ्यांमध्ये प्रतिष्ठेची बाब मानली जाते. राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याकरीता अधिकाधिक प्रोत्साहीत करण्याच्या उद्देशाने सन 1954 सालापासून राज्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात येते.
तब्बल 13 वर्षानंतर शिष्यवृत्ती रकमेत वाढ
उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी पास झाल्यानंतरच्या वर्षापासून 3 वर्षाकरीता व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी पास झाल्यानंतरच्या वर्षापासून 2 वर्षाकरीता शिष्यवृत्ती देण्यात येते. तथापि, विद्यार्थ्यांना सद्यस्थितीत देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम कमी असल्याने तसेच सदर शिष्यवृत्तीच्या रक्कमेमध्ये गेल्या 13 वर्षांच्या कालावधीमध्ये वाढ करण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रक्कमेमध्ये वाढ करण्यात आली आहे. ['आरटीई' 25 टक्के प्रवेश अपडेट पहा]
पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीत भरघोस वाढ
इयत्ता 5 वी तसेच 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा योजनेतील Scholarship रकमेत वाढ करून विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्याचा निर्णय शासनाने दिनांक 13 जून 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार दिनांक 3 जुलै 2023 रोजी शालेय शिक्षण विभागाने सविस्तर मार्गदर्शक सूचनानुसार शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार शिष्यवृत्तीच्या रक्कमेमध्ये पुढीलप्रमाणे वाढ करण्यात आली आहे.
- उच्च प्राथमिक शाळा इयत्ता 5 वी करीता 500 रुपये प्रति माह प्रमाणे वार्षिक 5000 रुपये, तर माध्यमिक शाळा इयत्ता 8 वी करीता 750 रुपये प्रति माह प्रमाणे वार्षिक 7500 रुपये करण्यात आली आहे.
- शिष्यवृत्तीचे सुधारीत दर हे सन 2023 24 पासून लागू राहणार आहे.
- उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजनेच्या अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसून, केवळ शिष्यवृत्तीची रक्कम वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे. [शासन निर्णय]