Contractual Employees Latest News : नुकतेच झालेल्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना नियमित शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता, याबाबत सरकारने सकारात्मक स्पष्टीकरण दिले आहे, आता राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना थेट नियमित पदावर कायम करण्याबाबत मंत्रालयात दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सविस्तर वाचा..
कंत्राटी कर्मचारी (NHM) शासन सेवेत नियमित होणार?
राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) अंतर्गत गेल्या 10 ते 15 वर्षांपासून आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माण अधिकारी या पदावर कार्यरत असणारे कर्मचारी हे कंत्राटी तत्वावर काम करत असून, त्यांना नियमित सेवेत सामावून घेण्यासंबंधी आयटक संघटनेच्या प्रतिनिधींची मा.आरोग्य मंत्री यांचे समावेत बैठक होऊनही अद्याप कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्याचे माहे मे 2023 मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे.
तसेच छत्रपती संभाजीनगर येथील मा. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार सदर कंत्राटी आरोग्य कर्मचान्यांच्या मागण्या मान्य करुन त्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे. असा प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
याबाबत राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मा. मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी याबाबत खुलासा केला असता, राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) अंतर्गत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. असे यावेळी सांगण्यात आले.
हे ही वाचा - कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत कायम बाबत मोठा निर्णय पहा - सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लेटेस्ट महत्वाचा शासन निर्णय पहा - मोठा निर्णय! वेळेआधी पगार मिळणार पहा
$ads={2}
कंत्राटी निदेशकांना शासन सेवेत सामावून घेण्याबाबत समितीची स्थापना
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील कंत्राटी शिक्षकीय पदधारकांचे शासकीय सेवेत समायोजन करण्याबाबत प्रश्नावर, सरकारने याबाबत पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण दिलेले आहे.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील कार्यरत कंत्राटी निदेशकांच्या मानधनात रुपये 15000 वरुन रुपये 25000 वाढ करण्याबाबत शासन निर्णय दिनांक 4 जुलै 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. दिनांक 16 मे 2023 च्या मंत्रिमंडळ बैठकीत कार्यरत कंत्राटी निदेशक यांना शासन सेवेत नियमित करणेबाबत मागणीच्या अनुषंगाने मा.मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करुन योग्य तो निर्णय घेण्यात यावा, असा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे, त्याअनुषंगाने याबाबतचा शासन निर्णय दिनांक 12 जुलै 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. सविस्तर वाचा..
महत्वाचे - तुम्हाला तलाठी भरतीचे हॉल तिकीट मिळाले नसेल तर येथे डाउनलोड करा
सरकारचे कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिले मोठे गिफ्ट!
देशभरातील बहुतांश राज्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच ओडिशा, छत्तीसगड, पंजाब, आंध्र प्रदेश व इतर काही राज्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित केल्या आहेत. आता मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री माननीय शिवराज सिंह चौहान यांनी राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे.