Contract Workers Employee News : छत्तीसगड सरकारने राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, रोजंदारी कर्मचारी, तासिका तत्वावरील कर्मचारी यांच्या पगारात भरघोस वाढ करण्याचा निर्णय दिनांक 19 जुलै 2023 रोजी घेण्यात आला आहे. त्यासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता DA आणि घरभाडे (HRA) भत्त्यातही मोठी वाढ करण्यात आली आहे. याचा राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना मिळणार आहे, सविस्तर बातमी वाचा..
सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी बुधवारी पुरवणी अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान राज्य कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांसाठी 2,000 कोटी रु तरतुदीची घोषणा केली आहे. राज्य कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केली असून, आता राज्यातील कर्मचाऱ्यांना 42% प्रमाणे महागाई भत्ता मिळणार आहे. याचा लाभ राज्यातील 5 लाखांहून अधिक राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे सरकारवर 800 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. [महाराष्ट्र सरकारी कर्मचारी DA न्यूज पहा]
$ads={2}
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात 27 टक्के वाढ
राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल 27 टक्के वाढ करण्याची घोषणा सरकारने केली आहे. बऱ्याच दिवसांपासून राज्यातील कंत्राटी कर्मचारी पगारवाढीची मागणी करत होते. सरकारच्या या निर्णयाचा फायदा राज्यातील 37 हजारांहून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. [महाराष्ट्रातील कंत्राटी कर्मचारी न्यूज पहा]
रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ
राज्यातील रोजंदारी तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा 4 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच तासिका तत्वावरील शिक्षकांच्या पगारात 2 हजार रुपयांची वाढ करण्यात आली असून, इतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात देखील वाढ करण्याचा निर्णय दिनांक 19 जुलै 2023 रोजी घेण्यात आला. याचा राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे.
#Announcement
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) July 19, 2023
संविदा वेतन पर विभिन्न विभागों में कार्यरत 37 हजार संविदा कर्मचारियों को सविंदा वेतन में 27 प्रतिशत की वृद्धि किए जाने की घोषणा करता हूँ।
सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे (HRA) भत्यात 9% वाढ
सातव्या आयोग वेतनश्रेणी नुसार सरकारी कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्त्यात वाढ केली आहे. राज्य सरकारने B श्रेणी शहरांसाठी HRA 9% पर्यंत वाढ केला आहे. तर C श्रेणी आणि इतर शहरांसाठी 6% घरभाडे भत्ता मिळणार आहे. आतापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोग वेतनश्रेणीनुसार घरभाडे भत्ता दिला जात होता.