Contract Basis Employment : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सम्रग शिक्षा अभियानांतर्गत विविध पदावर कंत्राटी पध्दतीने कार्यरत कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी शासन सेवेत सामावून घेण्याबाबत दिनांक 26 जुलै 2023 रोजी मा. सदस्य श्री.कपिल पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता, यावर सरकारने खुलासा केला आहे, सविस्तर वाचा..
सम्रग शिक्षा अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याबाबत
मा. सदस्य श्री.कपिल पाटील यांनी विधानपरिषदेत सम्रग शिक्षा अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याबाबत पुढील प्रश्न उपस्थित केले होते.
1) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी केंद्र व राज्य शासन पुरस्कृत सर्व शिक्षा अभियान शैक्षणिक वर्ष 2000-01 मध्ये समग्र शिक्षा अभियान जिल्हा समावेशित शिक्षण (अंध, मतीमंद व कर्णबधीर प्रवर्ग) विषय साधनव्यक्ती विशेष शिक्षक इ. विविध पदावर कंत्राटी पद्धतीने शेकडो शिक्षक कार्यरत आहेत, हे खरे आहे काय?
2) असल्यास, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 6 ते 8 वर्ष वयोगटातील मुलांना शाळेत दाखल करून इयत्ता 12 वी पर्यंतचे दर्जेदार शिक्षण देणे, सामाजिक आणि लैंगिक दरी नष्ट करणे, दिव्यांग विद्यार्थ्यांना नियमित शाळेत समावेशित शिक्षण देणे, गळतीचे प्रमाण शून्य टक्क्यांपर्यंत आणणे, मुला-मुलींना शिक्षण देणे इत्यादी कामे शिक्षक पार पाडत आहेत, हे खरे आहे काय?
3) असल्यास, सदर उपक्रमांतर्गत कार्यरत असणाऱ्या MIS Coordinator, संगणक प्रोग्रामर व डाटा एन्ट्री ऑपरेटर इत्यादी संगणकीय बाबीचे अद्ययावत ज्ञान असणे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागातील संगणकीय माहिती संकलित करणे, साख्यिकीय संशोधन करणे, वार्षिक कार्ययोजना अंदाजपत्रक निर्मिती करणे, जिल्हा व तालुका स्तरावरील संपूर्ण शाळानिहाय माहिती तयार करणे आणि अध्यापन विषयक कर्तव्य पार पाडणे अशा जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या शिक्षकांना रिक्त व विशेष शिक्षक पदावर कायम स्वरुपात सामावून घेण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे धोरण काय आहे?
4) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने बृहमुंबई महानगर पालिकेच्या शिक्षकांना रिक्त व विशेष शिक्षक पदावर कायम स्वरुपात सामावून घेण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे. नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत?
सम्रग शिक्षा अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याबाबत - सरकारचा खुलासा
यावर राज्याचे सन्मानीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी पुढीलप्रमाणे खुलासा केला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये समग्र शिक्षा अभियानांतर्गत सद्यस्थितीत जिल्हा समन्वयक 3 पदे, विषयसाधनव्यक्ती 55 पदे, विशेष शिक्षक, समावेशित शिक्षण (अंध, मतीमंद व कर्णबधीर प्रवर्ग) 33 पदे व इतर संवर्गातील 25 पदे अशी एकूण 116 पदे पद्धतीने कार्यरत आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 6 ते 8 वयोगटातील मुलांना शाळेत दाखल करून इयता 12 पर्यंतचे दर्जेदार शिक्षण देणे, सामाजिक आणि लैंगिक दरी नष्ट करणे, दिव्यांग विद्यार्थ्यांना नियमित शाळेत समावेशित शिक्षण देणे, गळतीचे प्रमाण शून्य टक्क्यांपर्यंत आणणे, मुला-मुलींना शिक्षण देणे इत्यादी कामे वर्गशिक्षकांनी पार पाडण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कार्यरत कर्मचारी साधनव्यक्ती म्हणून काम पाहतात.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत सदर कर्मचाऱ्यांची कंत्राटी तत्वावर निवड करण्यात आली आहे.
सदर कर्मचान्यांना दर सहा महिन्यानंतर एक दिवसाचा तांत्रिक खंड देवून सेवा सातत्य दिले जाते. समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्याची नियुक्ती तसेच मानधन आदीबाबत पूर्णतः जबाबदारी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई याची आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका ही स्वायत्त संस्था असून समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचे सेवादायित्व हे पूर्णतः केंद्र शासनाच्या अखत्यारीत येते. यास्तव सदर कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेच्या सेवेत कायम करता येणे शक्य नसल्याचा निर्णय महानगरपालिका शिक्षण समितीच्या ठराव क्रमांक 121, दिनांक 21/12020 अन्वये घेण्यात आला आहे. [IEDSS विशेष शिक्षक बातमी पहा]
हे ही वाचा - सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 60 वर्षे - शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ - कंत्राटी कर्मचारी निर्णय पहा - सारथी शिष्यवृत्ती खास योजना पहा
तारांकित प्रश्न - सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 60 वर्षे - शिक्षक भरतीचे वेळापत्रक जाहीर
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात २७% वाढ पहा