Calculate Salary From Basic Pay : केंद्र सरकारने महागाई भत्यात वाढ केल्यानंतर बहुतांश राज्य सरकारने राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता, महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना देखील बऱ्याच दिवसापासून महागाई भत्ता वाढीची प्रतीक्षा लागली होती, अखेर राज्य सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38% वरून 42% वाढवला असून, सातव्या वेतन आयोगानुसार दिनांक 1 जानेवारी 2023 पासून देण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच राज्यातील पाचवा व सहावा वेतन आयोगानुसार पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा DA मध्ये तब्बल 9 % ते 16% पर्यंत मोठी वाढ केली आहे. सातव्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतनश्रेणी संरचनेनुसार मूळ वेतनानुसार किती मिळणार लाभ सविस्तर पाहूया..
राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात 4% ने वाढ
महाराष्ट्र राज्य सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या सुधारित संरचनेनुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात 4 टक्क्याने वाढ केली आहे. सध्या राज्यातील कर्मचाऱ्यांना 38 % प्रमाणे महागाई भत्ता दिला जात आहे. आता हा DA 38% वरून 42% करण्यात आला आहे. सदर वाढीव DA दराप्रमाणे सदरचा लाभ हा दिनांक 1 जानेवारी 2023 पासून मिळणार आहे. म्हणजेच एकूण पाच महिन्याची थकबाकी सह जून च्या पगारात देय करण्याबाबत आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात 9% वाढ
राज्यातील काही कर्मचाऱ्यांना अद्याप सहाव्या वेतन आयोग लागू आहे. अशा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात 9% वाढ करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार सध्याचा महागाई भत्ता दर 212% होता. तोआता 221% पर्यंत करण्यात आला आहे. म्हणजेच एकूण DA मध्ये 9 टक्के वाढ करण्यात आली आहे. सदरचा लाभ हा दिनांक 1 जानेवारी 2023 पासून मिळणार आहे.
या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात 16% वाढ
राज्यातील ज्या कर्मचाऱ्यांना पाचव्या वेतन आयोगानुसार वेतनअदा केले जाते, अशा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात तब्बल 16% वाढ करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार सध्याचा महागाई भत्ता दर 396% वरून 412% करण्यात आला आहे. म्हणजेच एकूण DA मध्ये 16 टक्के वाढ करण्यात आली आहे. सदरचा लाभ हा दिनांक 1 जानेवारी 2023 पासून मिळणार आहे.
सुधारित वेतनश्रेणी संरचनेनुसार किती मिळणार लाभ? - (Basic Pay Calculator)
सातव्या वेतन आयोगानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी (7th Pay Commission) लागू करण्यात आली आहे. या संदर्भातील सुधारित वेतनश्रेणी संरचना लागू करणेबाबतचा सविस्तर शासन राजपत्र दिनांक 3 मार्च 2023 रोजी जारी करण्यात आले आहे.
राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार महागाई भत्यात वाढ ही सुधारित वेतनश्रेणी संरचना प्रमाणे लागू असणार आहे. म्हणजेच तुमचा दिनांक 1 जानेवारी 2023 रोजीच्या वेतनानुसार ही वाढ दिली जाणार आहे. तर महागाई भत्यात किती होणार वाढ? हे आपण एका उदा द्वारे समजून घेऊया. यासाठी तुम्हाला जानेवारी 2023 चे मूळ वेतन (Basic Pay) माहिती असणे आवश्यक आहे. [प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन वेगवेगळे असू शकेल, त्याप्रमाणे तुम्ही पुढील सूत्राच्या आधारे (Calculate Salary From Basic Pay) महागाई भत्ता वाढ किती मिळणार हे काढू शकता.]
- उदा. समजा तुमचे जानेवारी 2023 चे मूळ वेतन हे 26800 आहे.
- आता या मूळ वेतनाला 4 गुणून 100 ने भागावे. (26800 * 4 / 100 = 1072)
- म्हणजेच तुमच्या मूळ वेतनानुसार वाढीव DA च्या दराप्रमाणे जानेवारी महिन्याची वाढ ही 1072 रुपये असणार आहे.
- आणि असे जानेवारी ते जून एकूण 6 महिन्याची थकबाकी साठी 1072 ला 6 ने गुणावे. (1072 * 6 = 6432)
- म्हणजेच वाढीव दराप्रमाणे एकूण थकबाकी सहा 6 हजार 432 रुपये महागाई भत्ता वाढ मिळणार आहे.
7 व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा लाभ जून च्या पगारात आदेश पहा
पुढील अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.