एमपीएससी (MPSC) परीक्षेच्या मोफत पूर्व प्रशिक्षण तयारी साठी विद्यार्थ्यांना मोठी संधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (Barti Mpsc) पुणेमार्फत इच्छुक व पात्र युवक-युवतींकडून ऑनलाइन पद्धतीने Application Form मागवण्यात आले आहेत.
MPSC च्या मोफत पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेमार्फत Babasaheb Ambedkar Research and Training Institute (BARTI) महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य सेवा परीक्षेसाठी मोफत अनिवासी प्रशिक्षण खासगी प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक व पात्र तरुणांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत १० जुलै २०२३ पर्यंत आहे. [YCMOU ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु पहा]
प्रशिक्षणासोबत दरमहा मिळणार ९ हजार रुपये विद्यावेतन
MPSC प्रशिक्षणाचा कालावधी हा एक वर्षाचा असणार आहे. उमेदवारांची चाळणी परीक्षा ३० जुलै रोजी घेण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षणादरम्यान रोज ४ तास व त्यापेक्षा जास्त कालावधीचे प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच दरमहा ८० टक्क्यांपेक्षा जास्त कालावधी प्रशिक्षणास उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा ९ हजार विद्यावेतन देण्यात येणार आहे. [सरकारी बँकामध्ये नोकरीची सुवर्णसंधी]
तसेच विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज व विशेष शैक्षणिक साहित्य व पुस्तकांसाठी प्रतिविद्यार्थी २५ हजार रुपये देण्यात येईल. प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण कालावधीमध्ये कोणतीही शासकीय, निमशासकीय खासगी नोकरी अथवा व्यवसाय करता येणार नाही. ज्या उमेदवारांनी यापूर्वी बार्टी, पुणेमार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व यूपीएससी नागरी सेवा स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण घेतले आहे. त्यांची पुन्हा नव्याने प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार नाही, असे बार्टीने जाहीर केलेल्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.
ऑनलाईन अर्ज येथे करा
MPSC च्या मोफत पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी http://register.bart ieducare.in/student/register संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. [अधिकृत वेबसाईट]