मोठा निर्णय! अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! मानधनात मोठी वाढ! आता कर्मचाऱ्यांना मिळणार मोबाईल..

Anganwadi Employees News : राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने यापूर्वीच घेतला आहे. आता दैनंदिन कामासाठी तसेच ऑनलाईन काम करण्यासाठी मोबाईल उपलब्ध करुन देण्याबाबत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश दिले आहे, मात्र अद्यापही या लाभापासून अंगणवाडी कर्मचारी वंचित असल्याने हा मुद्दा राज्याच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करण्यात आला.

$ads={1}

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाईल मिळणार

Anganwadi Employees News

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामासाठी पोषण ट्रॅकर अॅपमध्ये मराठी भाषेत माहिती टंकलिखित करण्याची सुविधा तसेच ऑनलाईन काम करण्यासाठी उत्तम दर्जा व कार्यक्षमता असलेले मोबाईल उपलब्ध करुन देण्याबाबत मा. उच्च न्यायालयाने शासनाला मार्च 2023 महिन्यात निर्देश दिले आहे. राज्यातील अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे ? असा प्रश्न मा. सदस्यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.  

राज्यात एक लाखापेक्षा अधिक अंगणवाडी कर्मचारी कार्यरत असून त्यांना महिला बाल विकास विभागाकडून मराठीमध्ये पोषण ट्रॅकर भरण्यासाठी अॅप विकसित करून दिले आहे.

तारांकित प्रश्न कंत्राटी कर्मचाऱ्यांना (SSA) शासन सेवेत कायम - सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 60 वर्षे - शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ - कंत्राटी कर्मचारी नवीन धोरण PDF

केंद्र शासनाने अंगणवाडी सेविकांकरिता मराठी भाषेसह इतर स्थानिक भाषांमध्ये माहिती भरण्याची सुविधा पोषण ट्रॅकर अॅप्लीकेशनमध्ये उपलब्ध करुन दिलेली आहे. तसेच, अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालयाचे आदेश विचारात घेऊन केंद्र शासनाच्या GEM PORTAL वर मोबाईल फोन खरेदी संदर्भात निविदा प्रकाशित करण्यात आली आहे. त्यापुढील प्रक्रिया शासनाच्या दिनांक दिनांक 1 डिसेंबर 2016 रोजीच्या खरेदी धोरणानुसार पूर्ण करण्यात येईल. अशी माहिती सन्माननीय महिला व बालविकास मंत्री यांनी विधानपरिषदेत दिली.

अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांच्या मानधनात वाढ

राज्यातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका व मदतनीस यांना वाढीव मानधनाबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून त्याची त्वरित अंमलबजावणी करण्याबाबत मा. सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प 2023-24 नुसार राज्यात 81 हजार आशा स्वयंसेविका आणि साडेतीन हजार गटप्रवर्तक कार्यरत आहेत. आशा सेविकांसाठी 3500 तर गटप्रवर्तकांचे मासिक मानधन 4 हजार रुपये आहे. त्यात प्रत्येकी दीड हजार रुपये वाढ. अंगणवाडी सेविकांचे मानधन 8 हजार 325 रुपयांवरून 10 हजार रुपये तर मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरून 7200 रुपये तर अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरून 5525 रुपये वाढ करण्याची घोषणा करण्यात आली होती.

त्यानुसार महिला व बाल विकास विभागाच्या दिनांक 3 एप्रिल 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांचे मानधनात वाढ करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. सदर मंजूर करण्यात आलेली मानधन वाढ माहे एप्रिल २०२३ पासून लागू करण्यात आली आहे. अशी माहिती सन्माननीय महिला व बालविकास मंत्री यांनी विधानपरिषदेत दिली.

सरकारी अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now