7th Pay Commission Salary Arrears : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, राज्यातील कर्मचाऱ्यांना सद्या सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळत आहे, मात्र सातवा वेतन आयोगाची थकबाकी अजूनपर्यंत कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही, मात्र आता पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणी सादर करण्यासंदर्भात एक महत्वाची बातमी सविस्तर पाहूया.
सातवा वेतन आयोग थकबाकीचे हप्ते अदा करण्यासाठी पुरवणी मागणी सादर
सातवा वेतन आयोग थकबाकीचा पहीला, दुसरा, तिसरा व चौथा हप्ता कर्मचाऱ्यांना मिळण्याबाबत यापूर्वीच मा.आ.सुधाकर अडबाले विधानपरिषद सदस्य यांनी पाठपुरावा केला होता. त्यानुसार मा. शिक्षण संचालक (प्राथ) महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक 8 जून 2023 रोजी दिलेल्या पत्रानुसार राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचे सन 2023-24 मध्ये वैद्यकीय देयके, सातव्या वेतन आयोगाचा पहीला हप्ता, दुसरा हप्ता , तिसरा हप्ता आणि चौथा हप्ता अदा व इतर देयके अदा करण्यासाठी आवश्यक रक्कम ही येणाऱ्या अधिवेशनामध्ये तरतूदीची पुरवणी मागणी संचालनालयकडून शासनास करण्यात येणार असून, पुरवणी मागणी मंजूर झाल्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदांना मंजूर तरतूद उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आली होती.
सध्या राज्यातील पावसाळी अधिवेशन दिनांक 17 जुलै 2023 पासून सुरु झाले आहे. यामध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपदान/अंशराशीकरण व 7 वा वेतन आयोग थकबाकीचे हप्ते अदा करण्यासाठी पुरवणी मागणी सादर करण्यात येणार असून, लवकरच राज्यातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग थकबाकीचे हप्ते जुलै 2023 च्या वेतनात मिळण्याची शक्यता आहे.