University Admission Fees Discount : राज्यात उच्च शिक्षणाचा विकास व अभिवृद्धी करण्यासाठी खासगी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी संख्येच्या एकूण 10 टक्के इतक्या विद्यार्थ्यांसाठी, जे शासनाच्या निकषानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार शैक्षणिक शुल्कामध्ये 50 टक्के सूट देण्यात येणार आहे.
याव्यतिरिक्त आर्थिक दुर्बल किंवा अन्य निकषांच्या आधारे उर्वरित विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कातून सूट द्यावयाची असल्यास त्याबाबतचा निर्णय संबंधित विद्यापीठाच्या स्तरावर घेण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे.
ही सवलत संबंधित अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यापासून अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीसाठी लागू राहील. यासंदर्भात खासगी विद्यापीठास शासनाकडून कोणतेही अनुदान किंवा इतर वित्तीय सहाय्य मिळणार नाही. सदर निर्णयाचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे.
महागाई भत्ता ताज्या बातम्या येथे पहा
सातवा वेतन आयोग लेटेस्ट शासन निर्णय पहा
जुनी पेन्शन योजना मोठी अपडेट
शैक्षणिक शुल्कामध्ये सूट देण्याबाबतची प्रक्रिया ही विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष प्रवेशावेळीच संबंधित स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठाने अंमलात येणार आहे.
पुढील अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.
पुढील अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.