Talathi Bharti 2023 : सरकारी नोकरीच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील उमेदवारांसाठी एक महत्त्वाची अपडेट, शासनाने बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेली तलाठी भरती अखेर जाहीर केली आहे, राज्यामध्ये तलाठी भरतीच्या 4 हजार 625 जागा भरण्यात येणार असून, दिनांक 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत तलाठी भरती परीक्षा (Computer Based Test) आयोजित करण्यात आली आहे, तलाठी भरतीची प्रारूप जाहिरात प्रसिद्ध केली असून सविस्तर पाहूया..
राज्यात तलाठी पदाच्या 4 हजार 625 जागांची सरळसेवा भरती
तलाठी भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील लाखो उमेदवारांना अखेर दिलासा मिळाला असून, आता तलाठी भरती 2023 चा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात शासनाने प्रारूप जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार तलाठी भरती राज्य स्तरावर https://mahabhumi.gov.in/mahabhumilink (महा भूमी) या संकेतस्थळावरून राबविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) या पदाच्या संवर्गातील एकूण 4 हजार 625 जागांची सरळसेवा भरती करण्यात येत आहे.
सदरची भरती जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (MAHA BHUMI) महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयाकडून दि. 17 ऑगस्ट 2023 ते दि. 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत महाराष्ट्रतील एकूण 36 जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (Computer Based Test) परिक्षा घेण्यात येणार आहे.
तलाठी भरती तपशील
- पद - तलाठी
- विभाग - महसूल व वन विभाग
- एकूण पदे - 4625
- पगार (वेतनश्रेणी) - S-8 : 25500-81100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
आवश्यक शैक्षणिक पात्रता
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (पदवीधारक उमेदवार)
- शासनाने वेळोवेळी विहित केल्यानुसार संगणक / माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. (MS-CIT, CCC इ.)
- मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
आवश्यक वयोमर्यादा
- खुला प्रवर्ग - 18 ते 36 वर्ष
- मागासवर्गीय प्रवर्ग - 18 ते 43 वर्ष
- खेळाडू उमेदवार - 18 ते 43 वर्ष
- दिव्यांग उमेदवार - 18 ते 45 वर्ष
- प्ररकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त - 18 ते 45 वर्ष
- माजी सैनिक - 18 ते 45 वर्ष
- स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य - 18 ते 45 वर्ष
- पदवीधारक / अंशकालीन प्रवर्ग - 18 ते 55 वर्ष
महत्वाचे - महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय दि. ३ मार्च २०२३ नुसार दि. ३१ डिसेंबर २०२३ पूर्वी प्रसिध्द होणाऱ्या भरती जाहिराती करिता कमाल वयोमर्यादेच्या दोन वर्षे शिथिलता दिलेली असल्याने वर नमूद सर्व प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादेच्या दोन वर्षे इतकी शिथिलता असेल.{alertInfo}
परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम
तलाठी परीक्षेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असून, ऑनलाईन (Computer Based Test) पद्धतीने ही परीक्षा असेल, तर खालील अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होईल.
- मराठी (Marathi) - 25 प्रश्न - 50 मार्क्स
- इंग्रजी (English) - 25 प्रश्न - 50 मार्क्स
- अंकगणित व बुद्धिमत्ता - 25 प्रश्न - 50 मार्क्स
- सामान्यज्ञान (GK) - 25 प्रश्न - 50 मार्क्स
- एकूण - 100 प्रश्न - 200 गुण
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)
- वयाचा पुरावा
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- सामाजिकदृष्टया मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा
- आर्थिकदृष्टया दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा
- अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
- पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
- पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
- अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
- प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
- भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
- अराखीव महिला, मागासवर्गीय, आ.दु.व, खेळाडू, दिव्यांग, सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र
- एस. एस. सी नावात बदल झाल्याचा पुरावा
- मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
- विहित नमुन्यातील अनुभव प्रमाणपत्र (ज्या संवर्गाकरीता लागू असल्यास)
- MS-CIT प्रमाणपत्र अथवा शासन मान्य
महत्वाच्या तारखा
- ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी - जून 2023 ते जुलै 2023
- ऑनलाईन शुल्क भरण्याचा कालावधी - जून 2023 ते जुलै 2023
- हॉल तिकीट - ऑगस्ट 2023
- परीक्षा दिनांक - दिनांक 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023
जाहिरातीमध्ये बदल होण्याचे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत, त्यामुळे अधिकृत माहितीसाठी वेबसाईट -https://mahabhumi.gov.in
[प्रारूप जाहिरात येथे डाउनलोड करा]