State Government Employees News : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम (RTE Act) 2009 नुसार, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) ने उच्च प्राथमिक (वर्ग ६ वी ते ८ वी) वर्गांना शिकविणा या शिक्षकांच्या पात्रतेसंदर्भात आवश्यक अहर्ता तरतूद निश्चित करण्यात आली होती, व विहित कालावधीत पदोन्नती दिलेल्या शिक्षकांना पदवी प्राप्त करण्यास कळविण्यात आले होते, मात्र आता ज्यांनी ही अट पूर्ण केलेली नाही अशा पदोन्नती दिलेल्या शिक्षकांची पदस्थापना त्यांच्या मूळ पदांवर करण्याबाबत शासनाने आदेश काढले आहेत, सविस्तर पाहूया..
पदोन्नती संदर्भातील तरतूद..
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम (RTE Act) 2009 नुसार राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) ने उच्च प्राथमिक (वर्ग ६ वी ते ८ वी) वर्गांना शिकविणा या शिक्षकांच्या पात्रतेसंदर्भात सुधारित शासन निर्णय 13 ऑक्टोबर 2016 रोजी निर्गमित करण्यात आला होता.
जुनी पेन्शन योजना संदर्भात महत्वाची बैठक संपन्न - सविस्तर पहा
त्यानुसार सध्यस्थितीत विज्ञान विषय समूहातील पदवीधर शिक्षकांची कमतरता लक्षात घेता, जे शिक्षक विज्ञान विषय घेवून 12 वी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. अशा शिक्षकांना मान्यता प्राप्त मुक्त विद्यापीठाची पदवी प्राप्त करून घेण्यास प्रवृत्त करण्यात कळविण्यात आले होते. आणि या शिक्षकांची पदस्थापना विज्ञान विषय समूहातील पदवीधर शिक्षकांच्या जागेवर करण्याबाबत कळविण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष पदवी प्राप्त करेपर्यंत त्यांना पदवीधर वेतनश्रेणी देण्यात येवू नये असे देखील आदेशात नमूद करण्यात आलेले होते.
या शिक्षकांची पदोन्नती जाणार
पदोन्नती संदर्भात शिक्षकाची एका स्तरामधून दुसऱ्या स्तरामध्ये पदोन्नती करताना NCTE (National Council for Teacher Education) ने निश्चित केलेली किमान अर्हता धारण करणे आवश्यक आहे. यासंदर्भात शासन निर्णय दिनांक 16 ऑक्टोबर 2016 मधील (क्र.6) तरतुद कालबाह्य ठरत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आलेले आहे.
दिनांक 16 ऑक्टोबर 2016 मधील (क्र.6) तरतुद पहा 👇🏻
त्यामुळे आता शासनाने असा निर्णय घेतला आहे की, दिनांक 16 ऑक्टोबर 2016 मधील (क्र.6) ची तरतूद आता वगळण्यात आली आहे. सदर तरतुदीनुसार विज्ञान विषय घेऊन इ. 12 वी उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांना विज्ञान विषय समुहातील पदवीधर शिक्षक पदावर पदोन्नती दिली असल्यास, त्यांनी आवश्यक पदवी अहर्ता सदर परिपत्रकाच्या दिनांकापर्यंत अर्हता धारण केली नसल्यास, अशा शिक्षकांची पदस्थापना मूळ पदांवर करण्यात यावी असा आदेश दिनांक 23 जून 2023 रोजी काढण्यात आला आहे. [शासन आदेश पहा]
शासन आदेशातील 'ही' तरतूद पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा
शासन आदेशातील तरतुदीनुसार ज्या शिक्षकांना पदोन्नती मिळालेली आहे, त्यांनी विहित कालावधीत मान्यताप्राप्त मुक्त विद्यापीठाची आवश्यक पदवी प्राप्त केली आहे अशा शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
शिक्षक बदली महत्वाचे अपडेट पहा
सातवा वेतन आयोग लेटेस्ट शासन निर्णय पहा