State Government Employees DA Hike : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता 4 टक्क्याने वाढ करण्यात आली असून आता कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्के करण्यात आला आहे 1 जानेवारी 2023 पासून सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना 42 टक्के प्रमाणे महागाई भत्ता देण्याचा महत्त्वाचा शासन निर्णय वित्त विभागाने जारी केला आहे.
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात भरघोस वाढ!
राज्य शासकीय व कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या इतर पात्र दरात दिनांक 1जानेवारी 2023 पासून सुधारणा करण्याबाबत वित्त विभागाने आज दिनांक 30 जून 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.
राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे.
त्यानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना आता 38 % वरून 42 % प्रमाणे महागाई भत्ता मिळणार आहे. हा महत्वाचा शासन निर्णय वित्त विभागाने जारी केला आहे.
सातव्या वेतन आयोगानुसार 1 जानेवारी, 2023 मिळणार लाभ
शासनाने असे आदेश दिले आहे की, दिनांक 1 जानेवारी, 2023 पासून 7 व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्याचा दर 38 % वरून 42 % करण्यात यावा.
सदर महागाई भत्तावाढ दिनांक 1 जानेवारी, 2023 ते दिनांक 31 मे 2023 या कालावधीतील थकबाकीसह माहे जून 2023 च्या वेतनासोबत रोखीने देण्याबाबत आदेश निर्गमित केले आहे.
महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहणार आहे.