State Employees OPS News : जुनी पेन्शन योजना संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट बातमी समोर आली आहे, राज्य सरकारने नेमलेल्या अभ्यास गटाने Old Pension Scheme संदर्भात उपायोजनात्मक अहवाल राज्य शासनाकडे सादर केल्याचा दावा एका मिडीया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे, या समितीस तीन महिन्यात आपला अहवाल देण्याबाबत कळविण्यात आले होते, त्यानुसार आता 14 जून 2023 रोजी ही मुदत संपणार आहे, सविस्तर बातमी पाहूया..
त्रीसदस्यीय समितीचा अहवाल शासनास सादर?
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मार्च महिन्यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी बेमुदत संप पुकारला होता. यामध्ये जवळपास 17 लाख सरकारी कर्मचारी संपात सहभागी झाले होते. त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने त्रीसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती व या समितीस राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी पेन्शन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करून उपायोजना सुचवण्याबाबत आपला अहवाल तीन महिन्यांमध्ये सादर करण्यात बाबत कळवण्यात आले होते.
ही मुदत दिनांक 14 जून 2023 रोजी संपुष्टात येणार आहे, यापूर्वीच एका मीडिया रिपोर्टनुसार आता समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द केल्याची चर्चा सुरू झालेली आहे.
जुनी पेन्शन योजना संदर्भात महत्वपूर्ण बैठका संपन्न
सरकारने नेमलेल्या जुन्या पेन्शन योजना (Old Pension Scheme) संदर्भात अभ्यास गटाने राज्यातील विविध सरकारी कर्मचारी संघटना तसेच समन्वय समिती यांच्या सोबत दिनांक पहिली बैठक दिनांक 29 एप्रिल 2023 रोजी पार पडली. त्यांनतर पुन्हा 9 मे 2023 रोजी अभ्यास गट व राज्यातील इतर सरकारी संघटना व समन्वय समिती यांची बैठक संपन्न झाली यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात समन्वय समितीने आग्रही भूमिका मांडून आपला प्रस्ताव अभ्यास गटास सादर केला.
सरकारच्या निर्णयाकडे लागले लक्ष !
यापूर्वीच 'जुनी पेन्शन योजना' ही राजस्थान, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, झारखंड व पंजाब या राज्यात NPS नंतर पुन्हा OPS जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आता महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करावी या मागणीसाठी संप पुकारला होता. त्यावर तोडगा काढण्यासाठी नेमलेल्या समितीने उपाययोजनात्मक अहवाल शासनास सादर केल्याचे एका लोकप्रिय मिडिया रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे.
त्यानुसार आता या अहवालात दडलंय तरी काय? जुनी पेन्शन योजना लागू होणार का? याकडे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. लवकरच याबाबत शासन जून महिन्याच्या अखेरीस पर्यंत आपला निर्णय जाहीर करण्याची अपेक्षा राज्यातील कर्मचाऱ्यांना असून, सरकार जुनी पेन्शन योजनाबाबत सकारात्मक निर्णय घेईल असा दावा (State Employees OPS News) मिडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत घोषणा किंवा माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.