PVC Aadhar Card Online Apply : आधार कार्ड हे एक प्रत्येकासाठी महत्वाचे कागदपत्र आहे, प्रत्येक कामासाठी आपल्याला आधार कार्ड सादर करावे लागते, जसं आपलं एटीएम किंवा पॅन कार्ड प्लास्टिक स्वरूपात असत, अगदी तसंच आधार कार्डही मिळवता येते. UIDAI ने आधार कार्ड एका नव्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यास सुरुवात केलेली आहे. 'Aadhaar PVC Card' असं या नव्या स्वरूपाचं नाव आहे. हे PVC Aadhar Card Online Apply कसं करायचं ते Step-by-Step जाणून घ्या..
नव्या रूपात आलं 'आधार पीव्हीसी कार्ड'
सध्या बऱ्याच जणांकडे नॉर्मल आधार कार्ड आहे, जे तुम्ही सुरुवातीला आधार कार्ड काढले होते, त्याची प्रिंट आउट घेऊन किंवा तुम्हाला पोस्टाने आलेले साधे आधार कार्ड तुम्ही लॅमिनेशन करून जतन करून ठेवले आहे.
लॅमिनेट करूनही आधार कार्ड खराब व्हायला लागते कारण सध्या प्रत्येक कामासाठी आधार कार्डचा वापरच हा मोठ्या प्रमाणात होत आहे.
'युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया' (UIDAI) ने आधार कार्ड आता एका नव्या स्वरूपात देण्यास सुरुवात केली आहे ते म्हणजे आधार पीव्हीसी कार्ड असं त्याचं नाव आहे.
PVC चा फुल फॉर्म हा Poly Vinyl Chloride असा आहे. म्हणजेच आता नवीन आधार हे जसं आपलं एटीएम कार्ड किंवा पॅन कार्ड प्लास्टिक स्वरूपाचं असत, तसंच हे पीव्हीसी आधार कार्ड टिकाऊ आहे.
पॅन-आधार लिंक आहे का? लगेच चेक कराआधार पीव्हीसी कार्डची खास वैशिष्टे - Special Features of Aadhaar PVC Card
- आधार पीव्हीसी या कार्डाची प्रिटिंग क्वालिटी चांगली असते.
- PVC Aadhaar Card हे अधिक काळ टिकतं.
- विशेषतः ते पावसामुळेही ते खराब होत नाही.
- त्यावर क्यूआर कोड असल्यामुळे ऑफलाईन व्हेरिफिकेशनही करता येते.
चला तर आता आधार पीव्हीसी कार्ड ऑनलाईन कसं काढायचं, त्यासाठी काय प्रोसेस असते सविस्तर जाणून घेऊया..
आधार PVC कार्ड ऑनलाईन कसं काढायचं ? PVC Aadhar Card Online Apply Step-by-Step Guide
- सर्वप्रथम तुम्ही uidai.gov.in (UIDAI) या अधिकृत वेबसाईटवर जा.
- तिथे उजवीकडे वेगवेगळ्या भाषांचे पर्याय आहेत, त्यापैकी आवश्यक ती भाषा तुम्ही निवडू शकता.
- त्यानंतर Get Aadhaar (माझा आधार) पर्याय दिसेल, त्यातील Order Aadhar PVC Card या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर एका नवीन पेज ओपन होईल. तिथे Order Aadhaar PVC Card (आधार पीव्हीसी कार्ड मागवा) यावर क्लिक करा.
- आता पेजवर तुम्हाला पीव्हीसी आधार कार्ड कसं असेल ते दिसेल. जसं की यावर क्यूआर कोड, होलोग्राम असणार आहे.
- या पेजवर तुम्हाला आधार कार्ड नंबर (Enter Aadhaar Number) आणि कॅप्चा टाकायचा (Enter Captcha) आहे.
- आता तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असेल, तर तुम्ही डायरेक्ट ओटीपी पाठवा या पर्यायावर क्लिक करू शकता. पण ते नसेल तर इथल्या माझा मोबाइल नंबर नोंदणीकृत नाही या पर्यायासमोरील बरोबरच्या खुणेवर क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून ओटीपी पाठवा म्हणायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी पाठवला जाईल.
- ओटीपी प्रविष्ट करा या रकान्यात तो टाकायचा आहे. पुढे असलेल्या नियम व अटीवर क्लिक केलं की तुम्हाला स्क्रीनवर एक मेसेज दिसेल. "मी माझ्या आधार पीव्हीसी कार्डच्या छपाईसाठी संमती देतो. ते माझ्या पत्त्यावर पोस्टानं येईल आणि त्यासाठी मी 50 रुपये देण्यास सहमत आहे." अशा आशयाचा हा मेसेज आहे. मग प्रस्तुत करणे यावर क्लिक केलं की तुमचा अर्ज सबमिट होईल.
- पुढे तुम्हाला स्क्रीनवर एक मेसेज दिसेल. आपली विनंती नोंदवली गेली आहे असं त्यात नमूद केलेलं असेल आणि एसआरएन नंबर दिलेला असेल. या मेसेजखालील बरोबरच्या खुणेवर टीक करून आणि मग देय द्या या पर्यायावर क्लिक करायचं आहे. इथं वेगवेगळे पर्याय वापरून तुम्ही 50 रुपये भरू शकता.
मग एक नवीन पेज ओपन होईल. जिथं तुमचा व्यवहार यशस्वी झाल्याचं दिसेल. खाली एसआरएन नंबर दिलेला असेल, हा नंबर वापरून तुम्ही तुमच्या पीव्हीसी कार्डचं स्टेटस पाहू शकणार आहात.
पुढे कॅप्चा टाकला की मग पावती डाऊनलोड करा यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ही पावती डाऊनलोड होऊन मिळेल. या पावतीवर स्पष्टपणे नमूद केलंय की, तुमचं पीव्हीसी कार्ड 5 दिवसांत प्रिंट केलं जाईल आणि त्यानंतर ते स्पीड पोस्टनं आधार कार्डवरील पत्त्यावर पाठवलं जाईल.
पीव्हीसी कार्डचं स्टेटस कसं पाहायचं? - How to check the status of PVC card?
आता आपण ऑर्डर केलेल्या पीव्हीसी कार्डचं स्टेटसही तुम्ही ऑनलाईन पाहू शकता. ते कसं तर त्यासाठी तुम्हाला Get Aadhaar या रकान्यातील Check Aadhar Pvc Card Status या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक नवं पेज ओपन होईल. त्यात आधार पीव्हीसी कार्ड ऑर्डर स्थिती तपासा यावर क्लिक करा. इथं तुम्हाला पावतीवरील SRN नंबर आणि कॅप्चा टाकून सबमिट वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सध्याची स्थिती या पर्यायसमोर तुम्हाला तुमच्या कार्डाची स्थिती दिसते. जसं की ते प्रिटिंगसाठी गेलं असेल तर तिथं प्रिटिंग प्रक्रिया असं लिहिलेलं असतं किंवा ते डिस्पॅच झालं, म्हणजे पोस्टातून निघालं की त्याची तारीखही इथं नमूद केलेली असते.