Post Office GDS Recruitment 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी इंडिया पोस्ट ऑफिस मध्ये 12 हजार 828 जागांची मेगा भरतीची जाहिरात निघाली आहे, इयत्ता 10 वी पास उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे, ऑनलाइन अर्ज भरण्यास 22 मे 2023 पासून सुरुवात झाली असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत 11 जून 2023 पर्यंत देण्यात आली आहे, शेवटचे तीन दिवस शिल्लक असून इच्छुक उमेदवारांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, सविस्तर जाहिरात पाहूया..
पोस्ट ऑफिस मध्ये 12 हजार 828 जागांची मेगा भरती
जानेवारी 2023 मध्ये ग्रामीण ग्रामीण डाक सेवक या पदाची मोठी भरती केल्यानंतर आता इंडियन पोस्ट ऑफिस मार्फत शाखा पोस्टमास्टर Branch Postmaster (BPM) आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्टर Assistant Branch Postmaster (ABPM) या पदांसाठी भरती होणार आहे. (Post Office Gds Recruitment 2023)
याबाबतचे अधिकृत नोटिफिकेशन इंडियन पोस्ट www.indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटवर 20 मे 2023 रोजी जारी करण्यात आले आहे. त्यानुसार आता इयत्ता 10 वी पास उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे.
ऑनलाइन अर्ज भरण्यास 22 मे 2023 पासून सुरुवात झाली असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत 11 जून 2023 पर्यंत देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार https://www.indiapostgdsonline.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरू शकता.
10 वीच्या गुणांवर होणार थेट निवड
पोस्ट ऑफिस मध्ये निघालेले या भरतीमध्ये इयत्ता दहावी पास उमेदवारांची निवड ही दहावी परीक्षेच्या प्राप्त गुणांच्या आधारे केली जाणार आहे. अर्थात दहावीच्या गुणांवर उमेदवारांची थेट निवड होणार आहे. त्यानंतर कागदपत्र पडताळणी करून अंतिम निवड यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे या सुवर्णसंधीचा इच्छुक उमेदवारांनी अवश्य लाभ घ्यावा. [पोस्ट ऑफिस मेगा भरती जाहिरात PDF येथे पहा]