Old Pension Scheme News Maharashtra : राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे, दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता जुनी निवृत्तिवेतन योजनेतील कुटुंब निवृत्तिवेतन, रुग्णता निवृत्तिवेतन, मृत्यु उपदान, सेवानिवृत्ती उपदान इत्यादी लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सविस्तर बातमी पाहूया..
या कर्मचाऱ्यांच्या 'वारसांना' पेन्शन योजनेचा मिळणार लाभ
दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा तसेच, मान्यता प्राप्त खाजगी 100% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी जे परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे सदस्य आहे. अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे. [पेन्शन संदर्भात या सरकारचा मोठा निर्णय पहा]
जुनी निवृत्तिवेतन योजनेतील कुटुंब निवृत्तिवेतन, रुग्णता निवृत्तिवेतन, मृत्यु उपदान, सेवानिवृत्ती उपदान इत्यादी लाभ देण्याबाबत दिनांक 14 जून 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
पेन्शन योजनेतील हे लाभ मिळणार
दिनांक 14 जून 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार खालील लाभ लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचा सेवेत निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान, असतांना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान
- रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्या रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे.
- तसेच 100% अनुदानित शाळेतील सेवेतून निवृत्त होणाऱ्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे.
उपदान रक्कम म्हणजे काय?
उपदान म्हणजे शासनाकडून कर्मचाऱ्यांना मिळालेली रक्कम आहे. ही उपदान रक्कम कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीवर अवलंबून असते.
उदाहरण -
- समजा 1 वर्षाच्या आत सेवा - असल्यास मिळणारे उपदान - अंतिम वेतनाच्या दुप्पट रक्कम मिळते.
- 1 वर्ष ते 5 वर्ष सेवा - मिळणारे उपदान - अंतीम वेतनाच्या 6 पट रक्कम
- 5 वर्ष ते 11 वर्ष सेवा- उपदान - अंतिम वेतनाच्या 12 पट रक्कम
- 11 वर्ष ते 20 वर्ष दरम्यान सेवा, उपदान - अंतिम वेतनाच्या 20 पट रक्कम
- 20 वर्ष पेक्षा जास्त सेवा, उपदान - अंतिम वेतनाच्या 33 पट रक्कम
- (कमाल मर्यादा 14 लाख रुपये)
राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शासन निर्णयाच्या दिनांकापासून (दि 14 जून 2023) एक महिन्याच्या आत शासन निर्णयातील परिच्छेद क्र.4 प्रमाणे विकल्प देणे बंधनकारक राहील.
विकल्प नमुना फॉर्म
- नमुना 1 - कुटुंबाचा तपशील
- नमुना 2 - सेवेत असताना 100% अनुदानित पदावरील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी विकलांगतेमुळे शाळेतील सेवेकरिता असमर्थ ठरल्यास / मृत्यु पावल्यास त्याला अनुज्ञेय लाभ मिळण्याबाबतचा विकल्प नमुना 2 मध्ये भरणे आवश्यक आहे.
- नमुना- 3 - परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दि.1 नोव्हेंबर 2005 ते 14 जून 2023 पर्यंतच्या कालावधीत रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी / मृत्यु झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी द्यावयाचा विकल्प नमुना- 3 मध्ये भरणे आवश्यक आहे. (Old Pension Scheme News)
- सर्व नमुने फॉर्म व शासन निर्णय येथे डाउनलोड करा