New Education Policy : राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची अमलबजावणी सुरु असून, आता शिक्षण हक्क कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे, महाराष्ट्र बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क नियम 2023 ची अधिसूचना जारी करण्यात आली असून, आता यापुढे पाचवी, आठवीच्या वार्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे. सविस्तर बातमी पाहूया..
पाचवी, आठवीच्या वार्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होणे बंधनकारक
राज्य शासनाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार आता इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे. वार्षिक परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षेचा पर्याय असणार आहे.
या दरम्यान विद्यार्थ्याला संबंधित विषयासाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे आणि वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्याच्या आत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे.
जर इयत्ता पाचवी आणि आठवीचे विद्यार्थी परीक्षेत नापास झाले तर त्यांना त्याच वर्गात ठेवले जाणार आहे त्यामुळे आता पुढील वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षेत पास होणे आवश्यक आहे.
मात्र विद्यार्थ्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेतून काढले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (शासन निर्णय)
पालकांनो लक्ष द्या! शालेय विद्यार्थ्यांना आता वार्षिक परीक्षा पास होणे आवश्यक; शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णयपाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना वयानुरूप प्रवेश
शिक्षण विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार आता पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत वयानुरूप प्रवेश मिळणार आहे. तर सहावी ते आठवीच्या वर्गात वयानुरूप प्रवेश देताना इयत्ता पाचवीच्या वर्गाची वार्षिक परीक्षा विद्यार्थ्यांना पास होणे आवश्यक असणार आहे. [अधिसूचना येथे पहा]
'सिडको' महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी
दिव्यांग व्यक्तींसाठी केंद्र सरकारकडून विशेष प्रश्नमंजुषा; सहभागी होऊन डिजिटल प्रमाणपत्र मिळवा