Maharashtra Talathi Bharti 2023 : राज्यातील उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट, शासनाने बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेली तलाठी भरती अखेर जाहीर केली आहे, राज्यामध्ये तलाठी भरतीच्या 4 हजार 644 जागा भरण्यात येणार असून, दिनांक 26 जून 2023 पासून उमेदवारांना अर्ज करता येणार आहे, तलाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली असून, सविस्तर मार्गदर्शक सूचना व पदांचा जिल्हानिहाय तपशील देण्यात आला आहे. सविस्तर पाहूया..
तलाठी पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी मेगा भरती
तलाठी भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील लाखो उमेदवारांना अखेर दिलासा मिळाला असून, आता तलाठी भरती 2023 चा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात शासनाने अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार तलाठी भरती राज्य स्तरावर https://mahabhumi.gov.in/mahabhumilink (महा भूमी) या संकेतस्थळावरून राबविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) या पदाच्या संवर्गातील एकूण 4 हजार 644 जागांची सरळसेवा भरती करण्यात येत आहे.
तलाठी भरती तपशील
- पद - तलाठी
- विभाग - महसूल व वन विभाग
- एकूण पदे - 4644
- पगार (वेतनश्रेणी) - S-8 : 25500-81100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
आवश्यक शैक्षणिक पात्रता
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (पदवीधारक उमेदवार)
- शासनाने वेळोवेळी विहित केल्यानुसार संगणक / माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. (MS-CIT, CCC इ.)
- मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
आवश्यक वयोमर्यादा
- खुला प्रवर्ग - 18 ते 38 वर्ष
- मागासवर्गीय प्रवर्ग - 18 ते 43 वर्ष
- खेळाडू उमेदवार - 18 ते 43 वर्ष
- दिव्यांग उमेदवार - 18 ते 45 वर्ष
- प्ररकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त - 18 ते 45 वर्ष
- माजी सैनिक - 18 ते 45 वर्ष
- स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य - 18 ते 45 वर्ष
- पदवीधारक / अंशकालीन प्रवर्ग - 18 ते 55 वर्ष
महत्वाचे - महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय दि. ३ मार्च २०२३ नुसार दि. ३१ डिसेंबर २०२३ पूर्वी प्रसिध्द होणाऱ्या भरती जाहिराती करिता कमाल वयोमर्यादेच्या दोन वर्षे शिथिलता दिलेली असल्याने वर नमूद सर्व प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादेच्या दोन वर्षे इतकी शिथिलता असेल.{alertInfo}
परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम
तलाठी परीक्षेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असून, ऑनलाईन (Computer Based Test) पद्धतीने ही परीक्षा असेल, तर खालील अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होईल.
$ads={2}
- मराठी (Marathi) - 25 प्रश्न - 50 मार्क्स
- इंग्रजी (English) - 25 प्रश्न - 50 मार्क्स
- अंकगणित व बुद्धिमत्ता - 25 प्रश्न - 50 मार्क्स
- सामान्यज्ञान (GK) - 25 प्रश्न - 50 मार्क्स
- एकूण - 100 प्रश्न - 200 गुण
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)
- वयाचा पुरावा
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- सामाजिकदृष्टया मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा
- आर्थिकदृष्टया दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा
- अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
- पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
- पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
- अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
- प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
- भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
- अराखीव महिला, मागासवर्गीय, आ.दु.व, खेळाडू, दिव्यांग, सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र
- एस. एस. सी नावात बदल झाल्याचा पुरावा
- मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
- विहित नमुन्यातील अनुभव प्रमाणपत्र (ज्या संवर्गाकरीता लागू असल्यास)
- MS-CIT प्रमाणपत्र अथवा शासन मान्य
महत्वाच्या तारखा
- ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी - 26 जून 2023
- ऑनलाईन शुल्क भरण्याचा कालावधी - 25 जुलै 2023 पर्यंत
- हॉल तिकीट व परीक्षा दिनांक - https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देणेत येईल. तसेच उमेदवारांच्या प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल.