Maharashtra Manual Of Office Procedure 2023 : महाराष्ट्र कार्यालयीन कार्यपद्धती सुधारित नियमपुस्तिका आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली असून, यामध्ये बदलत्या काळात कार्यालयीन कामकाज पध्दतीत झालेले बदल विचारात घेऊन सुधारित आवृत्ती तयार करण्यात आली आहे, त्यानुसार आता गट ड कर्मचाऱ्यांना 'मल्टी टास्क स्टाफ' असे संबोधले जाणार आहे, तर कार्यालयीन कामकाज विनाविलंब पार पाडण्यासाठी. निर्णय प्रक्रिया गतिमान व सुलभ व्हावी याकरीता कार्यालयामध्ये शासकीय कामकाज ई-ऑफीस प्रणालीच्या माध्यमातून करावयाची कार्यपध्दती विषद करण्यात आली आहे.
महाराष्ट्र कार्यालयीन कार्यपद्धती सुधारित नियमपुस्तिका प्रसिद्ध
महाराष्ट्र कार्यालयीन कार्यपद्धती नियमपुस्तिका सन १९६३ मध्ये प्रथम प्रसिद्ध झाली असून, ती सन १९९४ मध्ये मराठीत पुनर्मुद्रित करण्यात आली. बदलत्या काळात कार्यालयीन कामकाज पध्दतीत झालेले बदल विचारात घेऊन महाराष्ट्र कार्यालयीन कार्यपद्धती नियमपुस्तिका २०२३ सुधारित आवृत्ती (इंग्रजी) दि.१/६/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
गट ड कर्मचाऱ्यांना मल्टी टास्क स्टाफ असे संबोधणार
महाराष्ट्र कार्यालयीन कार्यपद्धती नियमपुस्तिका २०२३ सुधारित आवृत्ती नुसार प्रकरण ३ अधिकारी, कर्मचारी व त्यांची कार्ये यामध्ये अधिकारांची व कामांची विभागणी करण्यात आली असून, यापुढे शिपाई, दफ्तरी, जमादार, परिचालक (Operator), चौकीदार, सफाईवाला इ. गट 'ड' च्या कर्मचाऱ्यांना Multi Tasking Staff (MTS) असे संबोधण्यात आले आहे.
कार्यालयीन कामकाज वेळेत पार पडणार
- विभागांतर्गत टपाल
- प्रस्तावाची तपासणी सहभागीशी सल्लामसलत
- आवश्यकतेनुसार आंतरविभागीय सल्लामसलत विभागांतर्गत प्रस्तावांचे सक्षम प्राधिकाऱ्यांकडे सादरीकरण
- प्रस्तावास सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता मिळविणे
- संबंधित पक्षकारांना निर्णय - कळविणे
याच प्रमाणे अन्य क्षेत्रिय कार्यालयांत सादरीकरणाचे स्तर निश्चित करण्याची कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले आहे.
शासकीय कामकाज आता ई-ऑफीस प्रणालीच्या माध्यमातून होणार
शासकीय कामकाजात सुसूत्रता यावी, दस्तऐवज सुरक्षित राहावे आणि निर्णय प्रक्रिया गतिमान व सुलभ व्हावी याकरीता सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांत तसेच क्षेत्रीय कार्यालयामध्ये शासकीय कामकाज ई-ऑफीस प्रणालीच्या माध्यमातून करावयाची कार्यपध्दती नियमपुस्तिकेत प्रकरण २३ ई-ऑफीस प्रणाली कार्यपध्दती समाविष्ट करण्यात आली आहे.
तसेच माहिती तंत्रज्ञान विभाग शासन परिपत्रक दि.२३/२/२०२३ अन्वये ई-ऑफीस प्रणालीच्या कार्यपध्दतीविषयी सूचना यापूर्वीच निर्गमित करण्यात आल्या आहेत. सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, तसेच क्षेत्रीय कार्यालयांतील शासकीय कामकाज ई- ऑफीस प्रणालीच्या माध्यमातून करणे आवश्यक आहे.
[कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत लेटेस्ट बातमी पहा]
शासकीय कामकाज संदर्भात महत्वाची प्रकरणे
- प्रकरण ३ - अधिकारी, कर्मचारी व त्यांची कार्ये
- प्रकरण ५ ते ६ ई-ऑफीस प्रणालीच्या माध्यमातून टपाल स्विकृती, टपाल नोंदणी आणि टपालाचे वितरण
- प्रकरण ८- परिच्छेद १९ प्रकरण निपटारा व सादरीकरणाचे स्तर
- प्रकरण १५ - विधिविधान, अधिनस्थ विधिविधान यांसाठीचे प्रस्ताव व अभिप्रायांची प्रकरणे हाताळण्याची कार्यपध्दती
- प्रकरण १६ - महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद कामकाज
- प्रकरण १७ - परिच्छेद १- अभिलेख व्यवस्थापन, अभिलेखांचे वर्गीकरण, निंदणीकरण व नष्ट करणे
- प्रकरण १८ - माहिती व्यवस्थापन
- प्रकरण २० - वार्षिक कृती आराखडा व नागरिकांची सनद
- प्रकरण २२ - निरीक्षणे कर्मचारीवर्गाच्या बैठका इ.
- प्रकरण २३ - ई-ऑफीस प्रणाली कार्यपध्दती
महाराष्ट्र कार्यालयीन कार्यपद्धती नियमपुस्तिका २०२३ PDF डाउनलोड
महाराष्ट्र कार्यालयीन कार्यपद्धती नियमपुस्तिका २०२३ च्या इंग्रजी प्रती सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना पाठविण्यात आल्या आहेत. तसेच सदर नियमपुस्तिका सामान्य प्रशासन विभागाच्या संकेतस्थळावर तसेच ई-ऑफीसच्या Dashboard वर उपलब्ध करण्यात आली आहे. [महाराष्ट्र कार्यालयीन कार्यपद्धती सुधारित नियमपुस्तिका PDF 2023 डाउनलोड करा] (Maharashtra Manual Of Office Procedure PDF 2023)
नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.