SSC Result Date 2023 Maharashtra Board : राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, बऱ्याच दिवसापासून निकाल कधी लागणार? याबद्दल राज्यातील पालक विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते, आता या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल उद्या दिनांक 2 जून 2023 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे, तेव्हा तुमचा निकाल सर्वात आधी कोठे आणि कसा पाहायचा ? याबद्दल सविस्तर माहिती पाहुया..
दहावीचा निकाल जाहीर होणार उद्या?
फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण विभागीय मंडळामार्फत दहावी बोर्ड परीक्षा घेण्यात आल्या होत्या. [शिक्षणासाठी बिनव्याजी कर्ज मिळणार येथे पहा]
बारावीचा निकाल 25 मे 2023 रोजी जाहीर झाल्यानंतर दहावीच्या मुलांना निकालाची उत्सुकता लागली होती, आता दहावीचा निकाल उद्या दिनांक 2 जून 2023 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार असून, तत्पूर्वी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र बोर्ड पुणे कार्यालयातून पत्रकार परिषदेत अधिकृत निकाल घोषित होणार आहे.
दहावीचा निकाल सर्वात आधी पाहण्यासाठी महत्वाच्या अधिकृत लिंक पुढे दिलेल्या आहेत. वेबसाईट स्लो झाल्यास तुमचा निकाल तुम्ही SMS द्वारे पाहू शकणार आहे.
दहावीचा निकाल SMS द्वारे मोबाईलवर असा चेक करा
Maharashtra HSC Result On SMS : दहावीचा निकाल पाहण्यासाठी एकदम साईट वर लोड आल्यास मोबाईलवर SMS द्वारे पाहता येणार आहे. त्यासाठी खालील स्टेप फॉलो करा
- मोबाईल मधील Messaging App ओपन करा
- तिथे उजव्या बाजूच्या + या आयकॉन वर क्लिक करा
- त्यांनतर कॅपिटलमध्ये MHSSC असे टाईप करा, आणि त्यापुढे तुमचा रोल नंबर टाइप करा.
- हा एसएमएस SMS 57766 या क्रमांकावर पाठवा.
- क्षणात तुमच्या निकालाचा मेसेज तुम्हाला मिळेल.
सर्वात आधी येथे पहा तुमचा निकाल, डायरेक्ट लिंक
महाराष्ट्र बोर्डच्या mahresult.nic.in आणि mahahsscboard.in. या वेबसाईटवर निकाल चेक करता येणार आहे.
दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल पुढील अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे.