Kendra Pramukh Bharti 2023 : अखेर राज्यातील केंद्रप्रमुख भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, राज्यात 2 हजार 384 जागांची मोठी भरती निघाली आहे, त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन प्रणालीव्दारे www.mscepune.in या संकेतस्थळावर दि 1 डिसेंबर ते दि 8 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन आवेदनपत्र व शुल्क भरण्याची कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले आहे.
केंद्रप्रमुख भरतीची जाहिरात प्रसिद्ध
महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेव्दारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023 चे महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रांवर आयोजन करण्यात आले आहे.
राज्यात 2384 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु
राज्यामध्ये केंद्रप्रमुख पदासाठी 2384 जागांची मेगा भरतीची जाहिरात निघाली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन प्रणालीव्दारे www.mscepune.in या संकेतस्थळावर दि 1 डिसेंबर ते दि 8 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन आवेदनपत्र व शुल्क भरण्याची कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले आहे.
वेतनश्रेणी
केंद्रप्रमुख पदासाठी पुढीलप्रमाणे वेतनश्रेणी असणार आहे.
वेतनश्रेणी - S15 : 41800-132300
आवश्यक पात्रता अटी व शर्ती
- जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए. / बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
- जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा (शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.
- प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे. त्या दिनांकापासून 3 वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा (शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.
- विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत कमाल वयोमर्यादा ५० वर्ष राहील..
- विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल, त्याच जिल्हयासाठी पात्र राहतील.
- सदरची भरती फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
- संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा., म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
लेखी परीक्षा स्वरूप योजना
- परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल.
- परीक्षेचे माध्यम गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणार नाही.
- सदर परीक्षा एकूण 200 गुणांची राहील व त्यासाठी 2 तासाचा कालावधी राहील.
- परीक्षेचे टप्पे - एक लेखी परीक्षा
- परीक्षेचे स्वरूप - वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
- प्रश्नपत्रिका - एक
- एकूण गुण - 200
निवड प्रक्रिया
- लेखी परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल.
- जाहिरातीमध्ये नमूद अहर्ता / पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
- भरती प्रक्रियेदरम्यान अंतिम शिफारस यादी निवड यादी तयार करतांना समान गुण धारण करणान्या उमेदवारांचे क्रमांकन / प्राधान्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार निश्चित करण्यात येईल.
अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व कालावधी
- ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक - https://ibpsonline.ibps.in/mscepapr23
- ऑनलाईन अर्ज - दिनांक 1 डिसेंबर 2023 ते दिनांक 8 डिसेंबर 2023
- ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरीता अंतिम दिनांक - दिनांक 8 डिसेंबर 2023
- ऑनलाईन परीक्षा दिनांक - www.mscepune.in या संकेतस्थळावर कळविण्यात येईल.
- केंद्रप्रमुख अधिकृत जाहिरात येथे पहा