Forest Department Recruitment 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी वन विभागातील वनरक्षक (गट क) भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, 10 वी, 12 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे, विशेष म्हणजे यावेळी तब्बल 2 हजार 138 जागांसाठी मोठी भरती निघाली आहे, ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत ही दिनांक 30 जून 2023 पर्यंत आहे. संपूर्ण जाहिरात पाहूया..
वन विभागामध्ये 2138 जागांसाठी मेगा भरती
वनविभागातील वनरक्षक (गट क) पदे सरळसेवेने भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहीत नमुन्यात अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅबमध्ये उपलब्ध लिंकवर मागविण्यात येत आहे.
सदर संकेतस्थळावर सविस्तर जाहीरात उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. प्रस्तुत पदांकरिता केवळ उक्त संकेतस्थळावरील लिंकवर विहित ऑनलाईन पद्धतीनेच केलेले अर्ज व ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येईल.
इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी संकेतस्थळ पाहून भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहणार आहे.
तलाठी भरती जाहिरात डाउनलोड करा
अंगणवाडी भरती जाहिरात येथे पहा
भरतीकरीता उपलब्ध पदे व वेतनश्रेणी
- एकूण पदे - 2138
- पदनाम - वनरक्षक (गट- क)
- वेतनश्रेणी - S-7 : रु. 21700-69100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते (सातव्या वेतन आयोगानुसार)
महत्वाच्या तारखा
- ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात - दिनांक - 10/06/2023
- ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत - दिनांक - 30/06/2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता
- उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
- अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
- माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
- नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा- यांचे पाल्य असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
- (टिप:- नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनख़बरे व वनः कर्मचा-याचे संबंधात वरील प्रयोजनाकरिता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलिस अधिकारी यांचे कडून निर्गमित केल प्रमाणपत्र विचारार्थ घेण्यात येईल.)
- अर्ज स्वीकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
- मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.
आवश्यक वयोमर्यादा
तलाठी भरती जाहिरात डाउनलोड करा
अंगणवाडी भरती जाहिरात येथे पहा
शारीरिक पात्रता
ऑनलाईन अर्ज असा करावा
- उमेदवाराला www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर जाऊन भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅबवर क्लिक करावे.
- या टॅब मध्ये अर्ज करण्याकरीता लिंक उपलब्ध राहील.
- तसेच या टॅबवर जाहीरात उपलब्ध आहे.
- सदर जाहीरातीचे अवलोकन करुनच उमेदवाराने अर्ज करावयाचा आहे.
- भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅबवर उपलब्ध लिंक वर क्लिक केल्यानंतर Registration (नोंदणी) हा पृष्ठ (Page) सुरु होईल.
- यामध्ये उमेदवाराने परिपूर्ण माहिती भरावी. एस.एस.सी. रोल नंबर भरताना एस.एस.सी. उत्तीर्ण झाल्याबाबत गुणपत्रिकेतील रोल नंबर नमुद करावा.
- Registration (नोंदणी) या पृष्ठावरील (Page) माहिती मरुन झाल्यानंतर सदर माहिती बरोबर असल्याची खात्री करावी लागेल.
- Registration (नोंदणी) झाल्यानंतर यामध्ये बदल करता येणार नाही.
- Registration (नोंदणी) झाल्यानंतर उमेदवारास Registration Number / Login id व Password ई-मेलद्वारे व एसएमएस द्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल.
- या Login Id व Password द्वारे उमेदवारास लॉग ईन करता येईल..