EPFO Higher Pension Date Extends : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पात्र व इच्छुक कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शनचा पर्याय निवडण्यासाठी आता अजून एकदा मुदतवाढ दिली आहे, वाढीव पेन्शनसाठीच्या EPF योगदानासाठी फॉर्म भरण्यासाठी कर्मचाऱ्यांना आता दिनांक 11 जुलै 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. आतापर्यंत वाढीव पेन्शनसाठी 16 लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांनी अर्ज दाखल केले आहे.
वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली
निवृत्ती नंतर वाढीव पेन्शनचा लाभ मिळण्यासाठी कर्मचार्यांकडून पर्याय/संयुक्त पर्यायांची निवड करण्यासाठी अर्ज सादर करण्याची यापूर्वी दि. 3 मे 2023 ते 26 जून 2023 पर्यंत मुदत वाढवण्यात आली होती. आता यामध्ये 15 दिवस वाढवून देण्यात आले आहे. म्हणजे पात्र निवृत्तीवेतनधारक, कर्मचाऱ्यांना दिनांक 11 जुलै 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. असे श्रम आणि रोजगार मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 4 नोव्हेंबर 2022 च्या निर्णयानुसार जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना EPFO मधील दुरुस्तीचा फायदा मिळावा यासाठी फॉर्म भरण्याची वाढवावी असे कळविण्यात आले. [प्रसिद्ध पत्रक]
कर्मचारी पेन्शन योजना - EPS - Employee Pension Scheme
EPS म्हणजे कर्मचारी पेन्शन योजना यामध्ये कर्मचारी निवृत्ती झाल्यानंतर दर महिन्याला मिळणारी पेन्शन किंवा निवृत्तीवेतन त्यालाच EPS - Employee Pension Scheme म्हणून ओळखले जाते.
EPFO- मध्ये कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारानुसार असे मिळते योगदान
कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतरही पगार मिळत राहावा या उद्देशाने EPS कर्मचारी पेन्शन योजनेची सुरुवात सरकारने सन 1995 साली केली.
- कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन (Basic) + महागाई भत्ता (DA) नुसार कर्मचारी आणि त्यांची संबंधित कंपनी किंवा संस्था यांचे 12 % + 12 % रकमेचा हप्ता असे योगदान EPFO मध्ये दिले जाते.
- यापैकी कर्मचाऱ्यांचे 12 टक्के हप्ता हा थेट EPF मध्ये जमा केला जातो. तर
- कंपनीच्या वाट्याचे दोन भाग होतात, त्यामध्ये 3.67 % भाग हा EPF मध्ये तर 8.33 % भाग हा EPS मध्ये जातो.
- त्याचबरोबर केंद्र सरकार देखील कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारावरील 1.16 % वाटा EPS म्हणजेच कर्मचारी पेन्शन योजना मध्ये दिला जातो.