Employees Transfer News : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट ! वेतनस्तर एस-16 संवर्गातील बदली धोरणात सुधारणा, नागरी सेवा मंडळाची स्थापना

Employees Transfer News : राज्यातील गट-ब वेतनस्तर एस-16 संवर्गातील अधिकारी (कर्मचारी) यांच्या बदली बाबत एक महत्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, आता सक्षम प्राधिकाऱ्यास शिफारस करण्यासाठी नागरी सेवा मंडळ स्थापन करण्यात आले आहे, याविषयीचा शासन निर्णय 9 जून 2023 रोजी निर्गमित केला आहे.

वेतनस्तर एस-16 संवर्गातील बदली धोरणात सुधारणा

employees transfer news

राज्य शासनाने 9 जून 2023 रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार मा. मंत्री, सार्वजनिक आरोग्य यांना प्रदान करण्यात आलेले सर्वसाधारण बदल्यांचे अधिकार आता (सामान्य राज्यसेवा गट-ब व वैद्यकीय अधिकारी गट-ब) आयुक्त, आरोग्य सेवा मुंबई यांना प्रत्यार्पित करण्यात आलेले आहेत. 

याअनुषंगाने सामान्य राज्यसेवा गट-ब व वैद्यकीय अधिकारी गट-ब (Pay Scale S-16) या संवर्गातील अधिका-यांच्या बदलीबाबत सक्षम प्राधिका-यास शिफारस करण्यासाठी नागरी सेवा मंडळ स्थापन करण्यात आले आहे.

राज्यातील सामान्य राज्यसेवा गट-ब व वैद्यकीय अधिकारी गट-ब (वेतनस्तर एस-16) संवर्गातील पदस्थापना व बदली याबाबत सक्षम प्राधिकाऱ्यास शिफारस करण्यासाठी नागरी सेवा मंडळ स्थापन करण्याचा शासनाने 9 जून 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करून महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

नागरी सेवा मंडळाची स्थापना

सामान्य राज्यसेवा गट-ब व वैद्यकीय अधिकारी गट-ब (वेतनस्तर एस-१६) संवर्गातील अधिका-यांच्या बदल्यासाठी नागरी सेवा मंडळ स्थापन करण्यात येत असून, 

नागरी सेवा मंडळाची रचना पुढीलप्रमाणे

  1. संचालक- 1, आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई - अध्यक्ष
  2. संचालक 2, आरोग्य सेवा आयुक्तालय, पुणे - सदस्य
  3. सहसंचालक, (अर्थ व प्रशासन) आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई - सदस्य

पुढील अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 


Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now