Employee Salary Increase News : राज्यातील अतिसंवेदनशील भागात कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने एकस्तर पदोन्नतीचा लाभ किंवा वेतनाच्या दीडपट दराने वेतन अधिक महागाई भत्ता यापैकी जे जास्त असेल तो लाभ दिनांक 1 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात आला आहे, तसा महत्वपूर्ण शासन निर्णय गृह विभागाने दिनांक 20 जून 2023 रोजी निर्गमित केला आहे.
अतिसंवेदनशील भागातील या कर्मचाऱ्यांना दीडपट वेतन
नक्षलग्रस्त भागातील गडचिरोली, अहेरी (पोलीस जिल्हा) व गोंदिया जिल्ह्यातील अतिसंवेदनशील पोलीस ठाणी / पोलीस उपठाणी / सशस्त्र दूरक्षेत्रे व कार्यालये येथे व अतिसंवेदनशील क्षेत्रात कार्यरत विविध शाखांचे पोलीस अधिकारी/कर्मचारी यांना अनुज्ञेय वेतनाच्या दीडपट दराने वेतन व महागाई भत्ता देण्याबाबत गृह विभागाने दिनांक 20 जून 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.
राज्य गुप्तवार्ता विभागाचे अधिकारी / कर्मचारी यांना एकस्तर पदोन्नतीचा लाभ ते राज्यात कोठेही कार्यरत असले तरी अनुज्ञेय आहे. तथापि, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यात काम करणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांच्या कामाचे स्वरुप अत्यंत जोखमीचे आहे.
यास्तव या जिल्ह्यात अतिसंवेदनशील भागात कार्यरत असलेल्या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या अधिकारी/कर्मचारी यांना प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने एकस्तर पदोन्नतीचा लाभ किंवा अतिसंवेदनशील पोलीस ठाणी/ पोलीस उप ठाणी / सशस्त्र दूरक्षेत्र येथे कार्यरत अधिकारी/कर्मचाऱ्यांप्रमाणे अनुज्ञेय वेतनाच्या दीडपट दराने वेतन अधिक महागाई भत्ता यापैकी जे जास्त असेल ते देण्यात येणार आहे.
नक्षलग्रस्त गडचिरोली, अहेरी (पोलीस जिल्हा) व गोंदीया जिल्ह्यातील अतिसंवेदनशील क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या (राज्य राखीव पोलीस दल, बिनतारी संदेश विभाग, मोटार परिवहन विभाग, गुन्हे अन्वेषण विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाहतूक विभाग, विशेष कृती दल, नक्षल विरोधी अभियान, राज्य गुप्त वार्ता विभाग इत्यादी सह) पोलीस अधिकारी/कर्मचारी यांना अनुज्ञेय वेतनाच्या दीडपट दराने मूळ वेतन व महागाई भत्ता मिळणार आहे.
त्याचप्रमाणे गोंदिया जिल्ह्यातील शासनाने निश्चित करण्यात आलेल्या पोलीस ठाणी / पोलीस उपठाणी/सशस्त्र दुरक्षेत्रे व कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकारी व राज्य सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांना देखील वेतनाच्या दीडपट दराने वेतन व महागाई भत्ता लाभ मिळणार आहे. सदरचा निर्णय हा दिनांक 1 एप्रिल 2023 पासून पुढील आदेशापर्यंत असणार आहे. शासन निर्णय येथे पहा
पुढील अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.
पुढील अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.