Dearness Allowance : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! या राज्य सरकारने 18 महिन्यांच्या थकबाकीसह महागाई भत्ता (DA) वाढवला

Dearness Allowance Increase News : तेलंगणा राज्य स्थापनेला दहा वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात दशकपूर्ती वर्ष साजरे होत आहे, यानिमित्ताने राज्यातील सरकारी कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठे गिफ्ट जाहीर केले आहे, कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता (DA & DR) मध्ये वाढ करण्यात आली आहे, सविस्तर बातमी पाहूया..

18 महिन्यांच्या थकबाकीसह महागाई भत्ता (DA) वाढवला

dearness allowance increase news

राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी तेलंगणा सरकारने महागाई भत्ता (DA) आणि (DR) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या 20.02 टक्के DA आणि DR मिळत होता. मात्र आता यापुढे 22.75 टक्के करण्यात आले आहे. कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये वाढ ही 1 जानेवारी 2022 पासून लागू असणार आहे. 

7.28 लाख कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार

राज्यातील UGC/AICTE/SNJPC वेतनश्रेणी 2016 नुसार वेतन घेणाऱ्या सर्व कर्मचार्‍यांसाठी ही वाढ दिनांक 1 जानेवारी 2022 पासून मूळ वेतनावरील DA चा दर सध्याच्या 31 टक्क्यांवरून 34 टक्के करण्यात आला आहे. 

राज्यातील जवळपास 7.28 लाख कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार असून, या वाढीमुळे सरकारवर वार्षिक 974.16 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. सुधारित वेतनश्रेणी 2015 नुसार, पगार घेणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ झाली आहे. सध्याच्या मूळ वेतनाच्या 55.53 टक्क्यांवरून ते मूळ वेतनाच्या 59.19 टक्के करण्यात आले आहे.

जुलै महिन्याच्या पगारात मिळणार वाढीव महागाई भत्ता

वाढीव दरानुसार कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2023 रोजी मिळणाऱ्या जून 2023 च्या पगारासह वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे. 1 जानेवारी 2022 ते 31 मे 2023 या कालावधीतील थकबाकी देण्याबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहे. या कालावधितील वाढीव दरानुसार एकूण 18 महिन्याच्या फरकासहित रक्कम कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

पुढील अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now