DA Hike News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नुकतेच केंद्र सरकारच्या वित्त विभागाने जारी केलेल्या निवेदनानुसार कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतनश्रेणी/ग्रेड पे मध्ये सुधारणा करत महागाई भत्त्याचे सुधारित दर जाहीर केले आहे. त्यानुसार आता कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात 412% पर्यंत वाढ करण्यात आली आहे. सविस्तर पाहूया..
महागाई भत्त्यात बंपर वाढ, वित्त विभागाने जारी केले सुधारित दर
केंद्र सरकार आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या कर्मचार्यांना 5 व्या केंद्रीय वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी/ग्रेड पे मध्ये मध्ये सुधारणा करत महागाई भत्त्याचे सुधारित दर जाहीर केले आहे.
केंद्र सरकार आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या कर्मचार्यांना सध्या पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळते. आता त्यांच्या DA मध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.
वाढीव महागाई भत्त्याचा (DA) दर हा 1 जानेवारी 2023 पासून त्यांना मिळत असलेल्या मूळ वेतनाच्या 396% दरावरून थेट 412% पर्यंत वाढ करण्यात आली आहे. या वाढीव दरानुसार आता जून महिन्याच्या पगारासोबत मागील सहा महिन्याची थकबाकी रक्कम मिळणार आहे.
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात होणार वाढ ?
केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यातील सरकारी कर्मचार्यांना देखील लवकरच गोड बातमी (DA Increase News) मिळणार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचार्यांच्या सध्याच्या मिळणाऱ्या 38 टक्क्यावरून 42 इतका महागाई भत्याबाबत निर्णय होईल का? याकडे राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
जुनी पेन्शन योजना ताज्या घडामोडी येथे पहा
अंगणवाडी मेगा भरती सुरु, लगेच करा अर्ज
जुनी पेन्शन योजना ताज्या घडामोडी येथे पहा
सातव्या वेतन आयोगाची थकबाकी आदेश पहा
RTE 25% प्रवेश घेण्याची अंतिम संधी अपडेट पहा
नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.