Contract Employees Regularization News : कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्याच्या मागणीला देशातील पंजाब, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश सरकारने राज्यातील कंत्राटी पद्धत पूर्णतः बंद करण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे, सद्या कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यास कार्यवाही सुरू झालेली असून, आता पंजाब सरकारने 14,239 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय दि 10 जून च्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला. सविस्तर बातमी पाहूया..
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित - मंत्रिमंडळाची मंजुरी
पंजाब सरकारने राज्यातील 35 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्याबाबत घोषणा केली होती. त्यानुसार आता राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना टप्प्या टप्प्याने सेवेत कायम करण्यात येत आहे.
पंजाब मंत्रिमंडळाने दिनांक 10 जून 2023 झालेल्या कॅबिनेट बैठकीत 14,000 हून अधिक कंत्राटी शिक्षकांच्या सेवा नियमित करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातील निर्णय घेण्यात आला.
आता या नियमित शिक्षकांना राज्य सरकारच्या धोरणानुसार वेतन, भत्ते आणि रजा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात 40 टक्के वाढ
पंजाब राज्य सरकारने राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात 15 ते 40 टक्क्यापर्यंत वाढ करण्याचा निर्णय मे 2023 मध्ये घेण्यात आला तसा वित्त विभागाने आदेश देखील जारी केले आहे.
पंजाबमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात 40% पर्यंत वाढ करण्यात आली आहे. शासनाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, ही वाढ 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार असून एकवेळ देण्यात आली आहे. त्यानंतर दरवर्षी कर्मचाऱ्यांच्या पगारात 5 टक्के प्रमाणे वाढ सुरु राहणार आहे. याचा राज्यातील 36000 कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाभ मिळाला आहे.
10,000 रुपये मासिक पगार असलेल्या कंत्राटी पद्धतीने भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना 40 टक्के वाढ मिळणार आहे, तर 10,001 ते 15,000 रुपयांपर्यंतच्या पगारात 30 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 15,001 ते 20,000 रुपये दरमहा कमावणाऱ्यांच्या पगारात आता 25 टक्के आणि 20,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पगार असणाऱ्यांच्या वेतनात 15 टक्के वाढ करण्यात आली आहे.
महागाई भत्ता ताज्या बातम्या येथे पहासातवा वेतन आयोग लेटेस्ट शासन निर्णय पहा
जुनी पेन्शन योजना मोठी अपडेट
पुढील अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.
पुढील अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.