Contract Employees News : कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, आंध्र प्रदेश सरकारने दिनांक 7 जून 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत नियमित करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला, या निर्णयाचा राज्यातील 10 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
कंत्राटी कर्मचारी सेवेत कायम, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 7 जून 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा राज्यातील 10 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
पाच वर्षे सेवा पूर्ण असलेले कर्मचारी होणार नियमित
आंध्र प्रदेश सरकारने नुकत्याच झालेल्या (दि 7 जून 2023) रोजीच्या कॅबिनेट बैठकीमध्ये राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा दिनांक 2 जून 2014 रोजी किमान पाच वर्षे पूर्ण झाली आहे. अशा कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित केले जाईल. असा महत्वपूर्ण निर्णय आंध्र प्रदेश सरकारने घेतला आहे. त्यामुळे राज्यातील 10000 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना गॅरंटी पेन्शन योजनेस मंजुरी
त्याच बरोबर सरकारी कर्मचाऱ्यांना गॅरंटी पेन्शन स्कीम (Guarantee Pension Scheme) योजनेस मंजुरी देण्यात आली असून, कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या पगाराच्या 50 टक्के निश्चित पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला. [सविस्तर येथे वाचा]
इतर महत्वपूर्ण निर्णय
- 6 हजार 840 नवीन पदांना मंजुरी.
- सुमारे 10 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय.
- सरकारी कर्मचाऱ्यांना गॅरंटी पेन्शन योजना
- जिल्हा मुख्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना16% दराने HRA
- नवीन डीएची अंमलबजावणी.
- PRC आयोगाची स्थापना.