Cabinet Design Latest News : महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात तब्बल 10 हजार रुपयांची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला, दिनांक 13 जून 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 10 मोठे निर्णय घेण्यात आले सविस्तर पाहूया..
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात तब्बल 10 हजार रुपयांची वाढ
दिनांक 13 जून 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले, यामध्ये विशेषतः कंत्राटी ग्रामसेवक आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला.
राज्यातील कंत्राटी ग्रामसेवकांना सध्या 6 हजार रुपयांप्रमाणे दरमहा मानधन देण्यात येत होते, यामध्ये आता तब्बल 10 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे, यापुढे कंत्राटी ग्रामसेवकांना आता 16 हजार रुपये प्रमाणे वेतन मिळणार आहे. या निर्णयाचा राज्यातील कंत्राटी पद्धतीने कार्यरत असणाऱ्या ग्रामसेवकांना दिलासा मिळाला आहे. [कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत केले कायम लेटेस्ट न्यूज पहा]
त्याचबरोबर अवकाळी पावसाने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना सुधारित दराने मदत करण्यात येणार असून, यासाठी राज्य सरकारने 1500 कोटी रुपयांची मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई सुधारित दराने मिळणार आहे.
कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ
कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात 10 हजार रुपये एवढी वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या या ग्रामसेवकास 6 हजार रुपये दर महिना मिळतात, आता ते 16 हजार एवढे मिळतील.
राज्यात सध्या 27 हजार 921 ग्रामपंचायती असून 18 हजार 675 नियमित ग्रामसेवकांची पदे आहेत. त्यापैकी 17 हजार 100 पदे भरली असून, 1575 पदे रिक्त आहेत.
वर्ष 2000 पासून ग्रामसेवकांची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतात. कृषी सेवक, ग्राम सेवक, शिक्षण सेवक यांच्या मानधनात वाढ झाल्यामुळे कंत्राटी ग्राम सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव होता. यापूर्वी वर्ष 2012 मध्ये वाढ करण्यात आली होती. यासाठी 1 कोटी 57 लाख 50 हजार रुपये इतका आर्थिक भार पडेल. [कंत्राटी कर्मचारी लेटेस्ट न्यूज पहा]
मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 10 मोठे निर्णय
- सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तात्काळ मदत करणार. १५०० कोटीस मान्यता.
- कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधनात वाढ करण्याचा निर्णय. आता मिळणार १६ हजार रुपये.
- अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्त्यामध्ये केंद्राप्रमाणे सुधारणा.
- पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्तीमध्ये वाढ.
- लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करणार.
- पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार.
- अतिरिक्त न्यायालये व जलदगती न्यायालयांना दोन वर्षे मुदतवाढ.
- मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता पुनर्वसन गृहे योजना.
- स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादेत वाढ.
- चिमूर आणि शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणार.