Anganwadi Bharti 2023 : महिलांसाठी सुवर्णसंधी! अंगणवाडीच्या 20601 जागांसाठी भरती सुरु, लगेच येथे करा अर्ज..

Anganwadi Bharti Maharashtra 2023 : राज्यातील अंगणवाडी भरती 2023 अंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे, राज्यभरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जवळपास 20 हजार 601 पदे भरण्यात येत आहे, महिला व बाल विकास विभाग अंतर्गत अंगणवाडी भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे, सविस्तर पाहूया..

अंगणवाडी अंतर्गत 20 हजार 601 पदांची मेगा भरती

Anganwadi Bharti 2023

महाराष्ट्र राज्यातील महिला व बालकल्याण विभागाच्या अंतर्गत अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जवळपास 20 हजार 601 पदे रिक्त असून, त्यासाठी अंगणवाडी भरती सुरु झालेली आहे, यामध्ये पुढीलप्रमाणे जागा भरण्यात येणार आहे. (Anganwadi Bharti 2023)

  • अंगणवाडी सेविका - 4 हजार 509 
  • मिनी अंगणवाडी सेविका - 623
  • मदतनीस - 15 हजार 466
  • एकूण - 20 हजार 601

12 वी उत्तीर्ण महिलांसाठी सुवर्णसंधी !

अंगणवाडी भरती आवश्यक शैक्षणिक पात्रता

अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका (किमान अर्हता 12 वी उत्तीर्ण)

अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदांसाठी इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.

वयोमर्यादा

अंगणवाडी भरती साठी आवश्यक वयोमर्यादा ही 18 ते 35 वर्ष आहे. (विधवा उमेदवारांसाठी 40 वर्ष)

अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका पगार

महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात घोषित केल्याप्रमाणे सुधारित पगार पुढीलप्रमाणे 

  • अंगणवाडी सेविका -  10 हजार रुपये 
  • मिनी अंगणवाडी सेविका - 7200 रुपये 
  • अंगणवाडी मदतनिस - 5525 रुपये

अंगणवाडी भरती निवड प्रक्रिया 

शैक्षणिक अहर्ता यासाठी एकूण 75 गुण आहेत. तर अतिरिक्त 25 गुण असे एकूण 100 गुणांच्या आधारावर अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मतदनीस या पदासाठी पात्र अर्जानुसार गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येते.

या पदांची निवड प्रक्रियेसाठी एकूण 100 गुणानुसार निवड यादी जाहीर करण्यात येते. शैक्षणिक अहर्ता यासाठी एकूण 75 गुण आहेत. तर अतिरिक्त 25 गुण असे एकूण 100 गुणांच्या आधारावर अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मतदनीस या पदासाठी पात्र अर्जानुसार गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येते.

अंगणवाडी निवड प्रक्रियेसाठी गुणांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

Anganwadi Bharti 2023

अंगणवाडी भरती सुरू, येथे करा अर्ज

अंगणवाडी भरती प्रक्रियेसाठी महिला व बाल विकास विभाग अंतर्गत एकात्मिक बाल विकास या (ICDS) या विभागाकडून अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

महत्वाचे

अंगणवाडी भरती प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने राबविली जाते. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष एकात्मिक बाल विकास या (ICDS) कार्यालयात जाऊन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही लगेच तुमच्या तालुका/मनपा क्षेत्रातील एकात्मिक बाल विकास (ICDS) या कार्यालयात जाऊन जाहिरातीची संपूर्ण माहिती घ्यावी आणि अर्ज सादर करावे. [वनविभागात मोठी भरती जाहिरात पहा]

जळगाव, सातारा, अहमदनगर, अकोला, जालना तसेच इतर जिल्ह्यात अंगणवाडी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, तुमच्या जिल्हा/तालुका/मनपा क्षेत्रात जाहिरात संदर्भात प्रत्यक्ष एकात्मिक बाल विकास या (ICDS) कार्यालयास भेट देऊन अधिक माहिती घ्यावी. [शासन निर्णय पहा]

आयटीआय ऑनलाइन प्रवेश सुरू येथे पहा
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now